पोलादपूरमध्ये शेतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:01 AM2020-06-18T01:01:45+5:302020-06-18T01:02:00+5:30

जूनमध्ये गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस : मान्सून वेळेत दाखल झाल्याने बळीराजा सुखावला

Accelerate agricultural activities in Poladpur | पोलादपूरमध्ये शेतीच्या कामांना वेग

पोलादपूरमध्ये शेतीच्या कामांना वेग

Next

पोलादपूर : यंदा चांगला पाऊस होणार असल्याच्या हवामान विभागाच्या अंदाजाचे समाधान शेतकरी राजा व्यक्त करत असून, शेतीच्या कामांनी वेग घेतल्याचे चित्र महाड आणि पोलादपूर तालुक्यातील गावागावांत दिसून येत आहे. गतवर्षी १७ जून, २०१९ रोजी पोलादपूरमध्ये ३ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी ७ मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनच्या ढगांच्या गडगडाटसह सरीवर सरी पडत असून, तालुक्यातील कोरड्या पडलेल्या नद्यांतून झुळझुळ पाणी वाहत निसर्गावर हिरवी झालर पसरत असल्याची वर्दी दिली आहे. आजमितीस महाड तालुक्यात २६० मिमी, तर पोलादपूरमध्ये ३१३ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी जूनमध्ये महाडमध्ये फक्त ४३.१० तर पोलादपूरमध्ये १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन तालुक्यांत २०१९ मध्ये झाला होता. जुलै व आॅगस्ट महिन्यात जास्त पाऊस पडला, तर हा पाऊस आॅक्टोबरपर्यंत लांबला होता. या वर्षी ३ जूनला चक्रीवादळाच्या दिवसापासून पाऊस सुरू असल्याने जास्त पावसाची नोंद झाल्याने जूनच्या पंधरवड्यात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. महाडमध्ये ७.५३ टक्के पोलादपूरमध्ये ९.२९ टक्के पाऊस पडला आहे.

तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरीवर सरी पडत असतात. तालुक्यातील उन्हाळ्याच्या दिवसांत कोरड्या पडलेल्या ढवली, कामथी, धोडवलीसह इतर नद्यांमध्ये पाणी साचल्याने नद्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. शेतीची विविध कामे सुरू असल्याने खरेदीसाठी अनेक शेतकरी बाजारपेठेमध्ये येत आहेत. मात्र, महाडसह पोलादपूर बाजारपेठेमध्ये सम-विषम दुकानांची अंमलबाजवणी सुरू केल्याने अनेक ग्राहकांना, तसेच शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

पर्जन्यमापन केंद्रे
पोलादपूरमध्ये तीन पर्जन्यमापन केंद्रे वाकण, कोंढवी, पोलादपूर तर महाडमध्ये महाड, बिरवाडी, तुडील, नाते, खरवली, करंजाडी अशी सहा कें द्रे आहेत. यामध्ये वाढ होण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण, उमरठ, तुर्भे खोरा, कशेडी परिसर, तर महाड तालुक्यातील दासगाव, वरंध/माझेरी, किल्ले रायगड, वाळण-माघरुन आदी ठिकाणी पर्जन्यमापन केंद्रे उभारणे
गरजेचे आहे.

Web Title: Accelerate agricultural activities in Poladpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी