Accident: म्हसळा घोणसे घाटात अपघात; दोन जणांचा मृत्यू, तीन जखमी
By राजेश भोस्तेकर | Published: October 5, 2022 02:22 PM2022-10-05T14:22:32+5:302022-10-05T14:23:08+5:30
Accident: सिमेंट ब्लॉक घेऊन जाणाऱ्या ट्रकला म्हसळा घोणसे घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात देवका रामा भुणेश्वर रा. म्हसळा ही महिला जागीच ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहेत.
- राजेश भोस्तेकर
अलिबाग - सिमेंट ब्लॉक घेऊन जाणाऱ्या ट्रकला म्हसळा घोणसे घाटात अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात देवका रामा भुणेश्वर रा. म्हसळा ही महिला जागीच ठार झाली असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.
सिमेंट ब्लॉक देण्यासाठी माणगाव वरून एमएच ४३ वाय ७६६४ ह्या नंबरचा ट्रक म्हसळाकडे निघाला होता. ट्रकमध्ये एक महिला, चालक आणि तीन पुरुष प्रवासी बसले होते. घोणसे घाट चढून तीव्र उतारावर ट्रक आला असता त्याचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्याच्या संरक्षित कठड्यावर जाऊन आदळले. ट्रक कठड्यावर आदळल्याने मागचे सिमेंट ब्लॉक केबिन वर येऊन आदळले. यामध्ये केबिनचा चक्काचूर झाला असून अपघातात प्रवासी महिला ही जागीच ठार झाली आहे. चालक सद्दाम हुसैनसह 3 पुरुष गंभीर जखमी झाले असून तात्काळ त्यांने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताचे वृत्त कळताच म्हसळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास म्हसळा पोलीस करीत आहे.