अलिबाग/पेण : पेण-खोपोलीदरम्यान एसटी आणि अमोनियावाहू टँकरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले आहेत. पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. नऊ जखमींवर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‘पेण-खोपोली’ ही एसटी बस सकाळी खोपोलीहून पेणकडे जात असताना गागोदे येथे अमोनियावाहू टँकरला तिची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, एसटीच्या डाव्या भागाचा चक्काचूर झाला, तर टँकरही रस्त्यावर कलंडला.अपघातामध्ये दिनेश खेडेकर (२६,रा. नाणेगाव, ता. पेण), रघुनाथ म्हात्रे(रा. बोरी, ता. पेण) यांचा मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले आहेत. वृषाली पवार या जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.जखमींना तातडीची मदत म्हणून एसटी महामंडळातर्फेएक हजार रुपये देण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अलिबाग सरकारी रुग्णालयाला भेट दिली.
खोपोली-पेण एसटीला अपघात; दोघांचा मृत्यू, ४२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:27 AM