मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनरची तीन वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू          

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 07:46 PM2021-07-01T19:46:14+5:302021-07-01T19:55:15+5:30

Accident on Mumbai-Pune Expressway : कंटेनरने धडक दिल्यानंतर आय टेन पूर्ण जळून खाक झाली. कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident on Mumbai-Pune Expressway; The container hit three vehicles; 3 killed | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनरची तीन वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू          

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनरची तीन वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू          

googlenewsNext

नितीन भावे  
                                                                                                                                                
खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३८ जवळ आडोशी गावच्या हद्दीत मुंबई लेनवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने आय टेन, इरटिगा आणि ट्रक या तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात आय टेनमधील एकाच कुटुंबातील आई-वडील आणि ४ वर्षाचा मुलगा या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडला. कंटेनरने धडक दिल्यानंतर आय टेन पूर्ण जळून खाक झाली. कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये जोक्विन चेटियार(३६), लुईझा चेटियार (३५) आणि डॅरील चेटियार (४) रा.नायगाव, मुंबई यांचा समावेश आहे.

लग्नाहून परतत होते चेटियार कुटुंबीय

लुईझा यांचे वडील जॉन रॉड्रिग्ज रा. अंधेरी यांची गाडीही त्यांच्या मागेच होती. आपल्या मुलीचा, जावयाचा आणि नातवाचा आपल्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याचे पाहून त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता. आपल्या मुलाचे काल पुण्याला लग्न होते. लग्नाचा कार्यक्रम झाल्यानंतर आज दुपारी दोन वाजता पुण्याहून निघालो. कंटेनरने जोरामध्ये आपल्या गाडीलाही कट मारला आणि थोड्याच वेळात समोर आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या गाडीला धडक दिल्याचे जॉन रॉड्रिक्स यांनी 'लोकमत' जवळ बोलताना सांगितले. 

आपल्या चार वर्षांचा नातवाचा नायगावच्या डॉन बॉस्को शाळेमध्ये आजच ऑनलाईन इंटरव्यू झाला होता. एक आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच मृत्यूने त्याला कवटाळल्यामुळे आपल्या नातवाच्या आठवणीने आजोबा जॉन रॉड्रिग्ज यांना अश्रू अनावर झाले होते. अपघाताचे वृत्त समजताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आय आर बी, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर, विजय भोसले, भक्ती साटेलकर यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले आणि वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
 

Web Title: Accident on Mumbai-Pune Expressway; The container hit three vehicles; 3 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.