खड्डे चुकवताना एचपी पेट्रोलपंपाजवळ अपघात; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

By निखिल म्हात्रे | Published: January 2, 2023 12:54 PM2023-01-02T12:54:38+5:302023-01-02T12:56:32+5:30

अलिबाग-कार्लेखिंड मार्गावरील रेवदंडा बायपास येथे ट्रक व मोटार सायकलचा अपघात झाला.

accident near hp petrol pump while dodging potholes one dead one injured | खड्डे चुकवताना एचपी पेट्रोलपंपाजवळ अपघात; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

खड्डे चुकवताना एचपी पेट्रोलपंपाजवळ अपघात; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग:अलिबाग-कार्लेखिंड मार्गावरील रेवदंडा बायपास येथे ट्रक व मोटार सायकलचा अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

जवळपास एक तास पोलीस कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. रेवदंडा बायपासवरुन पेणच्या दिशेने दोघेजण मोटार सायकलवरुन जात होते. एचपी पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर असलेले खड्डे चुकवित असताना मोटार सायकलस्वाराचा ताबा सुटल्याने मोटार सायकल डंपर खाली गेल्याने अपघात झाला.

ही घटना सकाळी 11.30 च्या दरम्यान घडली. या अपघातात मोटार सायकलचा चक्काचुर झाला. दुचाकीवरील गंभीर जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातातमुळे खडीने भरलेल्या डंपरमधील सर्व माल खाली काढल्यामुळे अलिबाग- पेण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: accident near hp petrol pump while dodging potholes one dead one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.