अलिबाग :
मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसने ट्रेलरला धडक दिली. या अपघातात चालकासह 14 प्रवासी जखमी झाले. यात 7 महिलांचा समावेश आहे. अपघात ग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी तातडीने जखमींना पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अपघातग्रस्त बस 22 प्रवासी घेवून रत्नागिरीतील खेड येथून मुंबईकडे निघाली होती. पेण जवळील हमरापूर फाटा इथं पुलावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कॉईल वाहक ट्रेलरला बसने मागून धडक दिली. अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झालंय.
गणेशोत्सव साजरा करून चाकरमानी हे मुंबईकडे येऊ लागले आहेत. अपघातग्रस्त वाहन ही कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करत होते. टेम्पो ट्रॅव्हलर (एम एच ४३ बीपी ०७५६ ) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. पेण हमरापूर पुलावर ट्रॅव्हल्स आली असता बंद पडलेल्या कॉईल ट्रेलर (एम एच ४६ एआर ००७४) ला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहनाची संख्या वाढली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. वेगाची मर्यादा चालक पाळत नसल्याने अपघाताला कारण ठरत आहे.
जखमींची नावे चालक सागर दिलीप गुरव वय ३१प्रतिभा महेश देवळे वय ३०रंजना दीपक भुवड वय २५मीनल काशिनाथ देवळे वय २५काशिनाथ पांडुरंग देवळे वय ५०सुरेश सखाराम नाचरे वय ४०प्रवीण काशिनाथ नाचरे वय ३४मंगेश मधुकर देवळे वय ४१स्वप्निला काशिनाथ देवळे वय ४७संजना संजय पाटील वय ३४समृद्धी संजय पाटील वय १४दीपक गंगाराम भुवड वय ३०श्वेता सुनील भुवड वय ३५संजना सुरेश नाचरे वय ३५