'तिथीप्रमाणे 24 व 25 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 08:15 PM2018-06-20T20:15:49+5:302018-06-20T20:15:49+5:30

24 व 25 जून रोजी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे.

According to the dates, Shivrajyabhishek Soula on Raigad on June 24 and 25 | 'तिथीप्रमाणे 24 व 25 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा'

'तिथीप्रमाणे 24 व 25 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा'

Next

जयंत धुळप

रायगड - ​​​​​​​रायगड जिल्हा परीषद,श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड, कोकण कडा मित्न मंडळ आणि महाराष्ट्रातील विविध शिवप्रेमी संघटना यांच्या सहयोगाने दरवर्षी साजरा होणारा श्रीशिवराज्याभिषेक सोहळा जेष्ठ शुद्ध त्नयोदशी या तिथीप्रमाणो दि. 24 व 25 जून रोजी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे. शिवराज्याभिषेकाचे हे 345 वे वर्ष असून समितीद्वारे गेली वीस वर्ष हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे.  यंदा या कार्यक्र माच्या मुख्य सोहळ्यात भोर येथील हिरडस मावळचे सरदार रायाजी बांदल यांचे वंशज रामचंद्र बांदल यांचा शिवसन्मान होणार असून या कार्यक्र माचे प्रमुख पाहुणो स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष रणजितराव सावरकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिली आहे.

गडदेवता शिर्काई देवीचे पूजनाने श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ

जेष्ठ शुद्ध द्वादशी आणि जेष्ठ शुद्द त्नयोदशी या तिथीप्रमाणो दोन दिवस साज:या होणा:या श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्यात रविवारी पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता गडदेवता शिर्काई देवीचे पूजन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सकाळी 1क् वाजता राजदरबार येथे छ्त्नपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व शिवव्याख्याचे प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान होणार आहे. सकाळी 11 वाजता व्याडेश्वर मंदिरात व्याडेश्वर पूजन होईल. 

संबळ वादक शिवाजी रेणके यांच्या पथकाचा पारंपारीक गोंधळ

रविवारी दुपारी 12 ते सायं. 4  पर्यंत जगदिश्वर मंदिरात जगदिश्वर पूजन निमंत्नीत दाम्पत्यांच्या उपस्थितीत होईल. सायं. 5 वाजता शिवप्रतिमेच्या शिवतुलादानाचा भव्य कार्यक्र म होईल या कार्यक्र मात ज्या शिवभक्तांना प्रसाद म्हणून काही वस्तु द्यायच्या असतील त्या त्यांनी द्याव्यात. सायं. 6 वाजता प्रसिद्ध संबळ वादक शिवाजी रेणके यांच्या पथकाचा पारंपारीक गोंधळाचा कार्यक्र म होईल. त्यानंतर रात्नौ 8 वाजल्या पासून राजदरबार येथे होणा:या सांस्कृतिक कार्यक्र मात विविध पोवाडे, ऐतिहासीक गाणी यांचे सादरीकरण होईल.

​​​​​​​सोमवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहोळ्य़ास प्रारंभ

जेष्ठ शुद्ध त्नयोदशी या दिवशी सोमवारी शिवराज्याभिषेकाचा मुख्य सोहळा सकाळी 6 वाजता जिल्हापरिषदेच्या शेडमधील पालखीप्रस्थान कार्यक्र मातून होईल. त्यानंतर नगारखान्यासमोरील भव्य ध्वजाचे ध्वजारोहण होऊन राजदरबार येथे मुख्य सोहळ्यास सुरूवात होईल. यावेळी सिंहासनारोहणानंतर भोर येथील हिरडस येथील सरदार रायाजी बांदल यांचे वशंज रामचंद्र बांदल यांचा शिवसन्मान सोहळा होईल. राजदर्शन घेऊन भव्य मिरवणूकीस सुरूवात होईल. मान्यवरांच्या उपस्थित शिवपालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर जगदिश्वरमंदिरापर्यंत हा पालखी सोहळा चालेल. जिल्हा परिषद शेड जवळ महाप्रसाद होऊन गडस्वच्छता करूनच शिवप्रेमी संघटना गडउतार होतील. 

प्लॅस्टीकमुक्त रायगड मोहीम राबविणार, शिवभक्तांना शिस्त पाळण्याचे आवाहन

यंदाच्या या कार्यक्र मात प्लॅस्टीकमुक्त रायगड ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्र मासाठी महाराष्ट्रातून हजारो शिवभक्त येतील असा अंदाज व्यक्त होत असून या कार्यक्र मास येणा-या शिवभक्तांनी पोलीस प्रशासनास पाचाड येथे गाडी पार्कींग व्यवस्थेस सहकार्य करून हा कार्यक्र म शिस्तीत पार पाडावा असेही आवाहन स्वागताध्यक्ष भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. 

Web Title: According to the dates, Shivrajyabhishek Soula on Raigad on June 24 and 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.