ट्रिपल तलाक प्रकरणातील आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:28 AM2019-07-17T05:28:10+5:302019-07-17T05:28:22+5:30

ढाकम हिला तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक देऊन स्वत:ची सोडवणूक करून पत्नीला वाऱ्यावर सोडणा-या ताबिश इब्राहिम ढाकम याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

The accused in the triple divorce case escaped | ट्रिपल तलाक प्रकरणातील आरोपी फरार

ट्रिपल तलाक प्रकरणातील आरोपी फरार

Next

आगरदांडा : मुरुड येथील माजी नगरसेविका नादीया ढाकम हिला तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक देऊन स्वत:ची सोडवणूक करून पत्नीला वाऱ्यावर सोडणा-या ताबिश इब्राहिम ढाकम याच्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताबिश याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. परंतु अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटल्यामुळे ताबिश हा फरार झाला असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे.
ताबिशचा पहिला विवाह झाला असताना सुद्धा त्याने दुसरे लग्न पहिल्या बायकोला अंधारात ठेवून केले होते. तसेच ताबिश हा नादिया हिला शारीरिक व मानसिक त्रास सुद्धा देत होता. या सर्व गोष्टीला कंटाळून नादिया यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने ताबिश इब्राहिम ढाकम याच्याविरोधात तक्रार के ली होती. ताबिश फरार झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी ताबिश याचा पोलीस शोध घेत आहेत तो दिसताच त्याला अटक करण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: The accused in the triple divorce case escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.