बारा खारभूमी योजनांवर कार्यवाही सुरू; राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 04:50 AM2017-11-19T04:50:37+5:302017-11-19T04:50:44+5:30

अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या पट्ट्यातील खारभूमी योजना, आंबा खोरे सिंचन प्रकल्पातील लाभधारकांना पाण्याचा हक्क, तसेच काळकुंभे प्रकल्प या तीन विषयांवर आढावा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Action on 12 Kharbandi schemes; Including National Hurricane Dangers Prevention Project | बारा खारभूमी योजनांवर कार्यवाही सुरू; राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात समावेश

बारा खारभूमी योजनांवर कार्यवाही सुरू; राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात समावेश

Next

- जयंत धुळप

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या पट्ट्यातील खारभूमी योजना, आंबा खोरे सिंचन प्रकल्पातील लाभधारकांना पाण्याचा हक्क, तसेच काळकुंभे प्रकल्प या तीन विषयांवर आढावा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार ठाणे येथील खारभूमी विकास मंडळाचे प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता यांनी नुकतीच सिंचन भवनात श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत तातडीची आढावा बैठक घेण्यात आली.
त्यानुसार अलिबाग तालुक्यांतील १२ खारभूमी योजनांच्या बांधबंदिस्ती व दुरस्तीच्या कामावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच काही खारभूमी योजनांचा समावेश राष्टÑीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात करण्यात आला आहे. या कामांकरिता लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील कुर्डुस ते माणकुले या खाडीकिनारच्या पट्ट्यात एकूण १२ खारभूमी योजना आहेत. यापैकी १५६ हेक्टर क्षेत्राची फणसापूर-कुर्डुस खारभूमी योजना १९५५-५६मध्ये बांधण्यात आली, तर ३३४ हेक्टर क्षेत्राची काचळी-पिटकरी खारभूमी योजना १९५६-५७मध्ये बांधण्यात आली. मात्र, त्यावर दुरुस्ती वा डागडुगीची कामे करण्यात आलेली नाही.
समुद्र संरक्षक बंधाºयास उधाणाच्या लाटांनी मोठी भगदाडे पडली होती. परिणामी, खारेपाणी भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता दोन्ही योजनांची कामे ‘राष्टÑीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पात’ समाविष्ट करण्यात आली आहेत.
प्रकल्पात समाविष्ट योजनांचा पर्यावरण व सामाजिक परिणाम अहवाल नुकताच पूर्ण झाला असून, त्यानुसार सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुधारित प्रकल्प अहवालाला नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट आॅथोरिटीकडून (एन.डी.एम.ए.) मान्यता मिळाल्यानंतर या कामासाठी निविदा काढण्यात येतील.
काचळी-पीटकरी योजनेची १३.६२ कोटी रुपये, तर फणसापूर-कुर्डुस योजनेची रु. ११.४९ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत अपेक्षित असल्याचे बैठकीत सांगण्यात आल्याचे भगत यांनी सांगितले.
कोपरी-चिखली खारभूमी योजना (५२ हेक्टर क्षेत्र) १९५५-५६ मध्ये करण्यात आली. विस्तार व सुधारण या लेखाशीर्षांतर्गत या योजनेच्या संरक्षक बांधाच्या पुन:स्थापनेचे व उघडी दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच योजनेच्या संपूर्ण नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
मेढेखार खारभूमी योजना (१७६ हेक्टर क्षेत्र) १९५३-५४ बांधण्यात आली होती.
देहेनकोनी खारभूमी (१६९ हेक्टर क्षेत्र) योजना १९५५-५६ मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, या दोन्ही योजना कांदळवनांमुळे बाधित झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

शहाबाज खारभूमी योजना ९.३९ कोटींचे अंदाजपत्रक
१शहाबाज खारभूमी (४९८ हेक्टर क्षेत्र) योजना १९६६-६७मध्ये बांधण्यात आली. पहिल्या टप्प्यात बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविणेचे काम पूर्ण केले आहे. तर योजनेच्या नूतनीकरणाचे ९.३९ कोटींचे अंदाजपत्रक नोव्हेंबर २०१७मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयास पाठविण्यात आले आहे. मंजुरी प्राप्त होताच या कामास प्रारंभ होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. कमळपाडा खारभूमी (३५० हेक्टर क्षेत्र) योजना १९६७-६८मध्ये बांधण्यात आली. २००५-०६ मध्ये विस्तार व सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत धामणपाडा बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण करून नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

धाकटापाडा-शहापूर योजनेचे
४.१४ कोटींचे अंदाजपत्रक
२धाकटापाडा-शहापूर खारभूमी (३४५ हेक्टर क्षेत्र) योजना १९५४-५५ मध्ये बांधण्यात आली. विस्तार व सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविणेचे काम पूर्ण केले आहे. योजनेचे ४.१४ कोटींचे संपूर्ण नूतनीकरणाचे अंदाजपत्रक आहे. नोव्हेंबर-२०१७मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयास पाठविण्यात आले आहे. मोठापाडा शहापूर खारभूमी (४७४ हेक्टर क्षेत्र) योजना शासनाच्या ताब्यात नाहीत. ही खासगी योजना शासनाच्या ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी जून २०१६मध्ये सादर केला आहे. याबाबतची कार्यवाही प्रतीक्षेत आहे.

धेरंड खारभूमी योजना ४.१४ कोटींचे नूतनीकरण अंदाजपत्रक
३धेरंड खारभूमी (१४९ हेक्टर क्षेत्र) योजना १९५५-५६मध्ये बांधण्यात आली. विस्तार व सुधारणा या लेखाशीर्षांतर्गत बांधाच्या पुन:स्थापनेचे काम व उघडी दरवाजे बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. या योजनेचे ४.१४ कोटी रुपये रकमेचे संपूर्ण नूतनीकरणाचे अंदाजपत्रक नोव्हेंबर-२०१७ मध्ये प्रशासकीय मान्यतेसाठी प्रदेश कार्यालयास सादर करण्यात आले आहे.

मानकुळे, सोनकोठा खारभूमी योजनेसाठी १०.७९ कोटींचे अंदाजपत्रक
४मानकु ले खारभूमी (५३२ हेक्टर क्षेत्र) योजना १९५६-५७मध्ये, तर सोनकोठा (२६५ हेक्टर क्षेत्र) योजना १९५५-५६मध्ये बांधण्यात आली. योजनांच्या लगत असलेल्या सोनकोठा, हाशिवरे व मानकुळे या शासकीय योजनांच्या बांधांना १९९३मध्ये मोठे भगदाड पडले होते. १९९३ ते १९९५ या कालावधीत हे भगदाड बुजवण्यासाठी तीन वेळा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भगदाड मोठे असल्याने डागडुजी कमकुवत ठरली.

Web Title: Action on 12 Kharbandi schemes; Including National Hurricane Dangers Prevention Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड