बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या ताब्यातील गट नंबर ७९६ मधील जागेमध्ये पक्के बांधकाम करून अतिक्र मण झाले होते. अतिक्र मण करणाºया चार व्यक्तींना वेळोवेळी नोटीस देऊन बांधकाम हटवण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेरीस दिवेआगर ग्रामपंचायतीने अतिक्रमण जागेवरील बांधकामांवर पोलीस बंदोबस्तामध्ये बुलडोझर फिरवित जागा ताब्यात घेतली. यामुळे अजूनही अतिक्र मण असणाºयांचे धाबे दणाणले. सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे खपवून घेतली जाणार नसल्याची तंबी दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच उदय बापट यांनी दिली आहे.पर्यटनामुळे दिवेआगर व परिसरातील जागेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे या भागामध्ये अतिक्र मण तसेच सर्व नियम धाब्यावर बसवून बांधकामाचे पेव वाढले आहेत. दिवेआगर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये समर्थ नगर भागामध्ये समुद्रकिनाºयालगत असलेल्या गट नंबर ७९६ ही ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ५६.४ पैकीच्या जागेवर अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे जांभ्या दगडाचे बांधकाम करून गोठे उभारण्यात आले होते. सदरचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आल्यानंतर २७ जुलै २०१६, २४ आॅगस्ट २०१६, १८ डिसेंबर २०१७ व ३० जानेवारी २०१८ अशा ग्रामपंचायतीने नोटीस बजावून अतिक्र मण काढण्यास सांगितले; परंतु नोटिसीनंतरही अतिक्र मण हटविले न गेल्याने शनिवारी ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तामध्ये सुमारे दीड एकर जागेवरील अतिक्रमण केलेल्या जागेवरील पक्के बांधकामावर बुलडोझर फिरविण्यात आला.
दिवेआगर ग्रामपंचायतीची अतिक्र मणावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:48 AM