धरमतर खाडीतील बेकायदा रेती उत्खननाविरोधात अलिबाग व पेण तहसिलदारांची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 04:27 PM2018-04-17T16:27:03+5:302018-04-17T16:27:03+5:30

अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी आज सकाळपासून  धरमतर खाडीत हाती घेतलेल्या बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक  मोहीमेमुळे जिल्ह्यातील बड्या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहे.

Action against Ali Bagh and Pen Tehsildar against illegal sand excavation in Dharamar Bay | धरमतर खाडीतील बेकायदा रेती उत्खननाविरोधात अलिबाग व पेण तहसिलदारांची धडक कारवाई

धरमतर खाडीतील बेकायदा रेती उत्खननाविरोधात अलिबाग व पेण तहसिलदारांची धडक कारवाई

Next

- जयंत धुळप 
अलिबाग - अलिबागचे तहसिलदार प्रकाश संकपाळ आणि पेणचे तहसिलदार अजय पाटणे यांनी आज सकाळपासून  धरमतर खाडीत हाती घेतलेल्या बेकायदा रेती उत्खननाविरोधातील धडक  मोहीमेमुळे जिल्ह्यातील बड्या रेती सम्राटांचे धाबे दणाणले आहे. 
आतापर्यंत धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंपांसह बेकायदा रेती उत्खनन करताना पकडण्यात आल्या आहेत. त्यावरील खलाशांनी खाडीत उड्या मारुन पलायन केले. दरम्यान दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंपासह पेटवून देवुन खाडीतच भस्मसात करुन टाकण्यात आल्याची माहिती अलिबाग तहसिलदार प्रकाश संकपाळ यांनी "लोकमत "शी बोलताना दिली आहे. या बोटींची किंमत सुमारे 32 लाख रुपये आहे.

Web Title: Action against Ali Bagh and Pen Tehsildar against illegal sand excavation in Dharamar Bay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.