रायगड : पुराेगामी महाराष्ट्राला लाजवणारा हा प्रकार आहे. सुडाच्या भावनेतून महाविकास आघाडी सरकार कसे काम करत आहे, हे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांना पाेलिसांनी केलेल्या अटकेवरून दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांनी बुधवारी अलिबाग येथे दिली.अर्णब गाेस्वामी यांना बुधवारी अटक करण्यात आल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विविध नेत्यांनी अलिबागच्या न्यायालयाकडे धाव घेतली, त्याप्रसंगी नार्वेकर बाेलत हाेेते.सरकाच्या विराेधात आवाज उठवणाऱ्यांच्या विराेधात हे सरकार पूर्ण जाेर लावून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. काेराेना, सुशांतसिंह राजपूत आणि पालघर येथील घडलेली घटना या विराेधात पुढे येणाऱ्यांना सरकार राेखत आहे, असा आराेप नार्वेकर यांनी केला. लाेकशाहीला लाजवणारा हा प्रकार असल्याने या घटनेचा निषेध करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केेले.दाेन वर्षांपूर्वीच हे प्रकरण बंद करण्यात आले हाेते. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आल्यावर कारवाई का करण्यात आली नाही, कारवाईसाठी दाेन वर्षे का वाट बघितली, असा सवालही त्यांनी केला. सरकारच्या नाकर्तेपणाविराेधात पत्रकारांनी आवाज उठविण्यास सुरुवात केल्यानेच पाेलिसांमार्फत त्यांना लक्ष करण्याचे काम सरकारने सुरू केले आहे, असेही नार्वेकर यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश माेहिते उपस्थित हाेते.
न्यायालयाबाहेर मोठी गर्दीन्यायालयाबाहेर विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांची मोठी गर्दी होती. न्यायालयातून अर्णब गोस्वामींना वैद्यकीय तपासणी बाहेर आणल्यानंतर, पोलीस गाडीला इलेक्ट्रॉनिक पत्रकारांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला. यावेळी भाजपचे नेते किरीट सोमय्या, जिल्हाध्यक्ष अॅड.महेश मोहिते यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.