अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

By Admin | Published: October 28, 2015 01:01 AM2015-10-28T01:01:39+5:302015-10-28T01:01:39+5:30

येथील मुख्य बाजारपेठेत तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यालगत अनेक जण टेबल, खुर्ची लावून व्यवसाय करीत आहेत.

Action against encroachment | अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

googlenewsNext

माथेरान : येथील मुख्य बाजारपेठेत तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यालगत अनेक जण टेबल, खुर्ची लावून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने सोमवारी नगरपरिषदेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला. नौरोजी उद्यान ते रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्यालगत असणाऱ्या सर्व स्टॉलधारकांचे सामान जप्ती करण्यात आले. काहींनी कारवाईपूर्वीच आपले सामान गुंडाळले.
आमचे पोट भरण्याचे साधनच जप्त केले तर आम्ही जगाचे कसे असा प्रश्न हे स्टॉलधारक करीत आहेत. दिवाळी सण जवळ आला असून या काळातच पर्यटनाचा हंगाम सुरू होते. नेमकी आत्ताच कारवाई झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया या स्टॉलधारकांनी व्यक्त केली आहे. बाजारपेठेतील मार्गावर दुतर्फा स्टॉल असल्यामुळे कोंडी होत असल्यामुळेच कारवाई केली असल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी अभियंता डी. मोरखिन्दकर, वरिष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान, राजेश रांजणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
१पनवेल : मुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणावर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत. इतर विभागाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असून महामार्गावर एकही बांधकाम राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. २कळंबोली सर्कलपासून एनएच ४ सुरू होत असून तो पनवेलमधून जातो. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, मात्र काही वर्षांपूर्वी तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या मार्गावर रहदारी जास्त असल्याने पनवेल शहरालगत सतत वाहतूक कोंडी होते.बीएड महाविद्यालय आणि आयटीआयलाही झोपड्यांचा विळखा पडला आहे. ३ भिंगारी ते पळस्पे ओएनजीसी वसाहतीदरम्यान ही परिस्थिती असून महामार्गालगत कलिंगडापासून कृत्रिम फुले व इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
अतिक्र मणाबाबत शिवसेनेचे पालिकेतील गटनेते रमेश गुडेकर यांनी आवाज उठवला आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला आहे.

Web Title: Action against encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.