शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

अतिक्रमणावर कारवाईचा बडगा

By admin | Published: October 28, 2015 1:01 AM

येथील मुख्य बाजारपेठेत तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यालगत अनेक जण टेबल, खुर्ची लावून व्यवसाय करीत आहेत.

माथेरान : येथील मुख्य बाजारपेठेत तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यालगत अनेक जण टेबल, खुर्ची लावून व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने सोमवारी नगरपरिषदेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला. नौरोजी उद्यान ते रेल्वे स्टेशनपर्यंत रस्त्यालगत असणाऱ्या सर्व स्टॉलधारकांचे सामान जप्ती करण्यात आले. काहींनी कारवाईपूर्वीच आपले सामान गुंडाळले. आमचे पोट भरण्याचे साधनच जप्त केले तर आम्ही जगाचे कसे असा प्रश्न हे स्टॉलधारक करीत आहेत. दिवाळी सण जवळ आला असून या काळातच पर्यटनाचा हंगाम सुरू होते. नेमकी आत्ताच कारवाई झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया या स्टॉलधारकांनी व्यक्त केली आहे. बाजारपेठेतील मार्गावर दुतर्फा स्टॉल असल्यामुळे कोंडी होत असल्यामुळेच कारवाई केली असल्याचे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी अभियंता डी. मोरखिन्दकर, वरिष्ठ लिपिक रत्नदीप प्रधान, राजेश रांजणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)१पनवेल : मुंबई - पुणे महामार्गालगत उभारण्यात आलेल्या अतिक्रमणावर लवकरच हातोडा पडणार आहे. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाने संबंधित पाचशे जणांना नोटिसा बजावल्या आहेत. इतर विभागाशी समन्वय साधण्याचे काम सुरू असून महामार्गावर एकही बांधकाम राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. २कळंबोली सर्कलपासून एनएच ४ सुरू होत असून तो पनवेलमधून जातो. पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता, मात्र काही वर्षांपूर्वी तो रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. या मार्गावर रहदारी जास्त असल्याने पनवेल शहरालगत सतत वाहतूक कोंडी होते.बीएड महाविद्यालय आणि आयटीआयलाही झोपड्यांचा विळखा पडला आहे. ३ भिंगारी ते पळस्पे ओएनजीसी वसाहतीदरम्यान ही परिस्थिती असून महामार्गालगत कलिंगडापासून कृत्रिम फुले व इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अतिक्र मणाबाबत शिवसेनेचे पालिकेतील गटनेते रमेश गुडेकर यांनी आवाज उठवला आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला आहे.