पनवेल : तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अतिक्र मणावर वनविभागाने कारवाईचा बडगा उगारत काही दुकाने तोडली. मात्र, या वेळी ग्रामस्थ एकवटल्यानंतर कारवाईबाबत अपिल दाखल केले असल्याने कारवाईला स्थगिती देण्यात आली.तालुक्यातील कोन येथील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्र मण करण्यात आलेले आहे. रस्त्याच्या कडेला दुकाने थाटण्यात आलेली आहेत. शनिवारी वनविभागाने येथील वाणिज्य गाळ्यांवर जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई केली. रस्त्याच्या रुं दीकरणाचे काम सुरू होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील अतिक्र मण हटविण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा या ग्रामस्थांना दिल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने केलेली ही कारवाई चुकीच्या पद्धतीची असल्याचे ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले. कारवाईदरम्यान वनविभागाचे सहायक वनरक्षक एन. एन. खुपते, पनवेलचे आरएफओ ज्ञानेश्वर सोनावणे यांच्यासह वनविभागाचे ५० ते ६० अधिकारी, कर्मचारी, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनविभागाची कोनमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 4:29 AM