प्रचारात ‘गुरुजी’ दिसल्यास कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:37 PM2019-10-12T23:37:03+5:302019-10-12T23:40:35+5:30
निवडणूक आयोगाचा दणका । सभा, प्रचार, प्रचारफेरीत दिसल्यास गमवावी लागणार नोकरी
विनोद भोईर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत, यानुसार कोणत्याही प्रचारसभेत किंवा प्रचारफेरीत शिक्षक दिसल्यास, त्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. अगदी खासगी शिक्षण संस्थांनाही याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हा निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस गुरुजींना सभेत, प्रचारफेºया सुरू असलेल्या मार्गाचा अवलंबही टाळावा लागणार आहे. निवडणूक म्हटले की साम-दाम-दंड-भेद अशा सर्व शक्तींचा वापर होतो. राजकीय पक्ष आपल्या पक्षांशी संलग्न असलेल्या सर्व संघटना दावणीला बांधतात.
मागील निवडणुकांचा आढावा घेतल्यास, ज्या राजकीय मंडळींच्या शिक्षण संस्था आहेत, तेथील शिक्षकांना प्रचारासाठी पाठविले जाते. त्यांच्यावर सभा, प्रचारफेरी, व्यवस्थापन अशा जबाबदाºया सोपविल्या जातात. मात्र, आता ते शक्य होणार नाही आणि चुकून एखादा शिक्षक प्रचार, सभेत आढळल्यास त्याला नोकरी गमवावी लागेल, शिवाय उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारही दाखल होऊ शकते.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अलीकडे प्रचारसभा, बैठका, प्रचारफेरी यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातात. अशा चित्रीकरणात शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात वावरणाºया शिक्षकांवर आता टाच येणार आहे. हा नियम शासकीय-निमशासकीय खासगी शिक्षकांनाही लागू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
प्रचारसभा, बैठकांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. अशा चित्रीकरणात शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात वावरणाºया शिक्षकांवर टाच येणार आहे.