पनवेल : रस्त्यावर बेशिस्तपणाचे दर्शन घडवत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर खारघर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. खारघर शहरात शेकडो रिक्षाचालक, दुचाकी, बेशिस्त पद्धतीने वाहन चालवत आहेत. काही नागरिकांनी याबाबत वाहतूक शाखेकडे तक्र ारी केल्या होत्या. खारघर वाहतूक शाखेकडून आॅगस्ट महिन्यात बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये त्यांच्याकडून १ लाख ९७ हजार ३०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला.खारघर परिसरात वाहतूक शाखेने चारचाकी गाड्या असलेल्या काचा, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, दुचाकीवर हेल्मेट न घालणे,मद्य पिऊन वाहन चालविणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, परवाना जवळ न बाळगणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. बेशिस्त पद्धतीने वाहन चालकांवर यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती खारघर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी प्रवीण पांडे यांनी दिली.
खारघर वाहतूक पोलिसांची कारवाई
By admin | Published: September 15, 2016 2:27 AM