माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:09 AM2019-11-09T01:09:47+5:302019-11-09T01:09:53+5:30

पर्यटकांची दिशाभूल थांबविण्याचा प्रयत्न

Action on Matheran's bowel nose | माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर कारवाई

माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर कारवाई

Next

कर्जत/ माथेरान : रायगड जिल्ह्यातील माथेरान हे पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन असून, येथील प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक तसेच दिशाभूल होते, अशा तक्रारी माथेरान नगरपालिकेत आल्या होत्या; त्याला अनुसरून येथील नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दस्तुरी येथे कारवाईसाठी नगरपालिकेतर्फे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले, त्यानुसार पोलिसांनी दस्तुरीवर घोडेवाले, हातरिक्षावाले, एजंट व हमालांवर कारवाई केली.

दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, मिनीट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत दस्तुरी येथील घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व हमाल हे येथे आलेल्या पर्यटकांची फसवणूक करत होते. याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनीही फसवणूक होते का? हे पाहण्यासाठी स्वत: दस्तुरी येथे एक दिवस घालवला. या दरम्यान पर्यटकांची फसवणूक व दिशाभूल फार मोठ्या प्रमाणात होते. हे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना पत्र लिहून येथील फसवणूक थांबवण्यासाठी कारवाई करण्यासंदर्भात लेखी स्वरूपात सांगितले. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार येथील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मंगळवार व बुधवारी धडक करवाई सुरू केल्याने घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व कुली यांचे धाबे दणाणले आहेत.

मंगळवारी मंकी पॉइंट येथे जाऊन घोडेवाल्यांना पोलिसांनी दिलेल्या नमदा क्रमांकांची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये दोन घोडे हे नमदा नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार घोडा परवाना क्रमांक ३२८ व ४५२ या घोडेमालकावर कारवाई केली. तर एका घोडेवाल्याने चक्क चार घोड्यांचे आठ हजार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या पर्यटकाला पोलीस ठाण्यात नेऊन एका घोड्याचे ११०० प्रमाणे दर घेऊन बाकीचे पैसे परत केल्याने पर्यटकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून दस्तुरी येथे जे घोडेवाले, रिक्षावाले, एजंट व हमाल येथे आलेल्या खासगी वाहनांच्या मागे धावतात त्यांना पार्किंगमध्ये येण्यास मज्जाव केला व पार्किंगच्या बाहेर पर्यटकांना सेवा द्यावी, असे सांगितले. मात्र, काही लोक अरेरावी करत होते, त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली.

मी, मंकी पॉइंट येथे असताना पोलीस कारवाई करताना माझ्या निदर्शनास आले म्हणून मी जाऊन पाहिले असता, एका घोडेवाल्याने चक्क एका घोड्याचा दर हा दोन हजार रुपये घेतला, हे पाहून मी स्वत: हैराण आहे, हा घोडेवाला मूळवासीय अश्वपाल संघटना यांचा असून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे व जर अशी फसवणूक होत असेल तर पोलिसांनी आवश्य करवाई करावी.
- आशा कदम, अध्यक्ष, स्थानिक अश्वपाल संघटना

दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक होते, अशा तक्रारी वारंवार होत होत्या, या फसवणुकीमुळे येथील पर्यटक संख्या रोडावली होती. इच्छा नसताना पर्यटकांना एक दिवसात फिरवून पाठवायचे यावर पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वागतार्ह आहे. यामुळे पर्यटक मोकळ्या मनाने येथील पर्यटनाचा स्वच्छंद आनंद घेऊ शकतो.
- राजेश चौधरी,
अध्यक्ष, व्यापारी फेडरेशन

Web Title: Action on Matheran's bowel nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.