नीरव मोदीच्या बंगल्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 04:46 AM2019-01-26T04:46:05+5:302019-01-26T04:46:08+5:30
हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अलिबाग-किहीम येथील बंगल्यावर जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली.
अलिबाग : हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अलिबाग-किहीम येथील बंगल्यावर जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. हा बंगला आठ ते दहा दिवसांत जमीनदोस्त करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
कारवाईच्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रांताधिकारी शारदा पोवार, उप कार्यकारी अभियंता मधुकर चव्हाण, बांधकाम, महसूल तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
मोदी याचा किहीम येथे ७० हजार चौरस फुटांवर बंगला आहे. या बंगल्यात स्वीमिंग पूल व भूमिगत बांधकाम केले आहे. बंगल्यातील सामान आपल्या ताब्यात घेऊन वसुली सक्त संचालनालयाने शुक्रवारी संध्याकाळी बंगल्याचा ताबा जिल्हा प्रशासनाकडे दिला. शुक्रवारी दुपारी ३.३० नंतर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरूवात केली.