३१ डिसेंबरची कारवाई; मद्यपींकडून दोन लाखांवर दंड वसुली
By निखिल म्हात्रे | Published: January 1, 2024 08:41 PM2024-01-01T20:41:50+5:302024-01-01T20:42:12+5:30
जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे.
अलिबाग : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ९० चालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यातील प्रत्येक नाक्यावर वाहतूक शाखेने वाहनचालकांची तपासणी करीत सुमारे २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षी ४० जणांवर कारवाई करीत साधारण ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे.
रायगडात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी मद्य प्राशन करुन मोटार चालविणाऱ्या वाहकांना चाप बसण्यासाठी आता नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावीत ब्रेथ अॅनिलायझर लावून ग्राहकानं किती दारू सेवन केलीय याचा शोध घेत मागील साधारणत: 90 मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तुम्ही किती दारू प्यायलात हे तपासण्यासाठी अल्को बुथमध्ये असणाऱ्या यंत्रणाला फक्त १० सेकंद लागतात. त्यामुळे तुम्ही गाडी चालवण्यायोग्य स्थितीत आहात का याचही माहिती याच बुथमध्ये लगेच दाखवली जाते. तसेच रक्तात ३० मिलीग्रॅम ते १०० मिलीग्रॅमपर्यंत अल्कोहोल आढळलं आणि तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असेच दारु प्राशन करीत मोटरसायकल चालविणाऱ्या 90 जणांकडून मागील तिन महीन्यात सुमारे 2 लाख 15 हाजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर मागील वर्षी 40 जणांवर कारवाई करीत साधारणता 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोटार अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत डंक अँण्ड ड्रायुव्ह ची मोहीम हाती घेतली आहे.
अनेक वाहन चालक हे बेशिस्तपणे तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवत असतात. तर काही वाहन चालक हे दारु पिऊन वाहन चालवत असतात. अशा वाहन चालकांमुळे अपघात होऊन त्यात निष्पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे वाहन चालकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये असे अवाहन नारीकांना केले होते, त्याला उत्फुर्त प्रतिसाद नागरीकांकडून मिळाला होता. मात्र काही ठिकाणी नागरीकांनी मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार घडले तेथे वाहतुक पोलिसांकडुन अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. या मोहीमेमुळे मद्य प्राशन करुन मोटारसायकल चालविणा-या मद्यपींना चाप बसला असल्याचे सोमनाथ घार्गे यांनी लोकमतला सांगितले.