वर्षभरात एक लाख चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 11:41 PM2021-01-03T23:41:26+5:302021-01-03T23:41:33+5:30

पळस्पे पोलीस मदत केंद्रातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर 

Action on one lakh drivers during the year | वर्षभरात एक लाख चालकांवर कारवाई

वर्षभरात एक लाख चालकांवर कारवाई

Next

मयूर तांबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे मार्फत २०२०मध्ये १ लाख ६ हजार २४ वाहनचालकांवर चलनादवारे कारवाई करण्यात आली आहे. विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणा-या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्रातील अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सन २०२० मध्ये इंटरसेप्टर वाहनादूवारे व मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणा-या ४१ हजार ७३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. व सीट बेल्ट न लावणे, मोबाईल संभाषण, लेन कटींग, काळया काचा, रिफलेक्टर नसलेल्या वाहनांवर तसेच इतर मो.वा.का.कलमाअंतर्गत ६४ हजार २८६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता डॉ. भुषणकुमार उपाध्याय अपर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या सुचनांप्रमाणे सुनिता साळुंखे - ठाकरे, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे, संजय बारकुंड पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सपोनि सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणा-या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले आहे. अधिकारी व अंमलदारांकडून करण्यात येणा-या कारवाई तसेच वाहन चालकांच्या प्रबोधनामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्राणांतीक अपघातामध्ये सन२०२० मध्ये सन २०१९ पेक्षा ४० टक्के पेक्षा अपघात कमी झालेले दिसुन येत आहेत.

वाहतूक नियमांबाबत जनजागृती 
कोरोना संसर्ग काळामध्ये काळात महामार्ग केंद्राच्या वतीने महामार्ग पोलीस अंमलदारांना तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचारी व देवदुत कर्मचारी आणि वाहनचालकांना सॅनीयायझर्स, मास्क शिल्ड, यांचे वाटप करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे कडुन अपघात कमी व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुक नियम व नियमनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेळोवेळी चौक सभा आयोजीत करुन टोलनाका येथे कार्यकम घेवुन वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची एका वर्षात ७५०००पत्रके वाटली. 

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडात्म्क कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते.
- सुभाष पुजारी, 
सहा. पोलीस निरीक्षक, 
महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे

Web Title: Action on one lakh drivers during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.