अलिबाग : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत १ लाख १५ हजार ६०१ वाहन चालकांवर कारवाई करीत, २ कोटी ८९ लाख ९९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये लायसन्स न वापरणाºया वाहन चालकांवर सर्वात जास्त कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आत वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.
बेशिस्त वाहन चालविणाºया वाहन चालकांना शिस्त लागावी, तसेच मद्यप्राशन करून गाडी चालविण्याचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांनी सध्या विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तर शाळांच्या परिसरात फिरणाऱ्यांना पोलिसांनी आवर घालण्याचा प्रयत्न केला असून, शहरातील मुलींच्या शाळा, बसस्थानक परिसरात पथके कार्यान्वित करून कारवाई तीव्र के ली आहे.शाळेच्या वेळेत किंवा शहरातून सुसाट वेगाने धावणाºया धूम स्टाइल बायकर्सच्या विरोधातही मोहीम उघडण्यात आली असून, त्यांना अडवून कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना आदी तपासणी केली जात आहे. त्यातील अनेकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली आहे, तसेच दररोज दहा ते पंधरा वाहनधारकांना दंड केला जात आहे.जिल्ह्यात जानेवारी, २०२० ते जुलै, २०२० या सात महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ७ हजार १४० जणांवर, अनधिकृत नंबर प्लेट वापरणाºया २०७, ओव्हर लोडिंग वाहतूक करणाºया, अति वेगाने गाडी चालविणाºया, धोकादायक ओव्हरटेक करणाºया ४१७ जणांवर, जादा प्रवासी वाहतूक करणाºया ४७४ जणांवर, लेन कटिंग करणाºया, सीटबेल्ट न लावणाºया १ हजार ३१९ जणांवर, टेल लाइट ७१ जणांवर, मोबाइलवर बोलत गाडी चालविणाºया २४७ जणांवर, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाºया ३७६ जणांवर, इन्शुरन्स न वापरणाºया ३५०, हेल्मेट न वापरणाºया ७९ जणांवर, काळ्या काचा वापरणाºया, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया अशा एकूण १ लाख १५ हजार ६०१ वाहन चालकांवर कारवाई करीत, २ कोटी ८९ लाख ९९ हजार १०० रु पयांचा दंड वसूल केला आहे.विशेष मोहीम सुरूच्धोकादायक वळणावर स्टंट करताना अनेक तरु ण दिसतात. याच्या तक्र ारी पोलिसांपर्यंतही गेल्या. त्यामुळे पोलीस नरीक्षक रवींद्र शिंदे यांनी काही वाहतूक विभागाचा चार्ज हाती घेतल्यावर वाहन चालकांना शिस्त लागावी, म्हणून विशेष मोहीम राबविली. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी ही मोहीम सुरू केल्यानंतर बाइक धूम स्टाइलने चालविणाºयांवर जरब बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेकांवर कारवाई करण्यात आली.