वासांबे स्वच्छता समितीची कारवाई; प्लास्टिक पिशव्या पुरवणारी रिक्षा पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:27 PM2020-01-17T22:27:31+5:302020-01-17T23:01:26+5:30
दंडात्मक रक्कम गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
मोहोपाडा : वासांबे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता समितीने मोहोपाडा बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्या वापरणाºया दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परिसरात प्लास्टिक पिशव्या पुरविणारी रिक्षा पकडून त्यातील जवळपास ७० किलो वजनी प्लास्टिक पिशव्या जप्त करत दुकानदारांवर दंडात्मक कारवाई के ली. रोख रक्कम गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे सुपूर्द केली.
शासनाने ५० मायक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे, यामुळे मोहोपाडा शहरातील दुकानात प्लास्टिक पिशव्या बंदीविरोधात ठोस पावले उचलण्यात आली. या वेळी दुकानदार, फेरीवाल्यांकडून पिशव्या जप्त करण्यात आल्या.
या आधी ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईही केली होती. सद्यस्थितीला प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीबाबत विसर पडला असून, दुकानदार व फेरीवाल्यांना कोणाचीच भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे, याकरिता वासांबे स्वच्छता समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी मोहोपाडा बाजारपेठेतील दुकानदारांकडून आणि फेरीवाल्यांकडून शेकडो किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाईही केली. तरीही अनधिकृत फेरीवाल्यांकडून ग्राहकांना पातळ पिशव्या दिल्या जात असल्याचे वासांबे स्वच्छता समितीच्या लक्षात आले. त्यांनी दुकानदारांना प्लास्टिक पिशव्या पुरविणाºयाला पकडण्यासाठी सापळा लावला. रिक्षा क्रमांक एम एच-४६, एझेड-७८६१ ही रिक्षा पकडून त्यातील जवळपास ७० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ही कारवाई स्वच्छता समितीचे अध्यक्ष अरुण गायकवाड, रेश्मा भगत, विवेक ओक, सुप्रिया गायकर, मिलिंद कावडे आदीनी केली. शिवाय बाजारपेठेतील दुकानदारांकडून रोख १३ हजार दंडही वसूल केला.
१३ हजार रु पये दंड वसूल
अरुण गायकवाड म्हणाले की, परिसरात प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासंबंधी जनजागृती करणे गरजेचे आहे. कारवाईत जवळपास ७० किलो प्लास्टिक पिशव्या व रोख १३ हजार खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय भोये, विस्तार अधिकारी शिंदे, गटविकास अधिकारी संजय बडे व सरपंच ताई पवार यांच्याकडे सुपूर्द केले. वासांबे स्वच्छता समितीने चांगला उपक्रम राबविला असून त्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, असे गटविकास अधिकारी संजय भोये यांनी सांगितले.