दरोड्यामध्ये पोलीस दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई

By admin | Published: January 8, 2017 12:34 AM2017-01-08T00:34:59+5:302017-01-08T00:34:59+5:30

अपहरण, खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अलिबाग पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांना अटक करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस

Action taken after the conviction of the Dacoit | दरोड्यामध्ये पोलीस दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई

दरोड्यामध्ये पोलीस दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई

Next

- जयंत धुळप,  अलिबाग
अपहरण, खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अलिबाग पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांना अटक करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यात ते पोलीस दोषी निष्पन्न झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, अशी स्पष्टोक्ती रायगडचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केली. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यावर पारसकर यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच सागरी सुरक्षा हा वेगळा आणि महत्त्वाचा विषय या जिल्ह्यात आहे. त्याचा आढावा शुक्रवारी घेऊन त्यातील अपुऱ्या तांत्रिक कर्मचारीवर्गाच्या समस्येचा पाठपुरावा करून, ती व्यवस्था सक्षम करण्याचे काम आपण प्रथम करणार असल्याचे पारसकर यांनी सांगितले. औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगडमधील औद्योगिक कारखान्यांमधील अपघात व संबंधित समस्यांच्या निराकरणाकरिता आवश्यक कारखान्यांचा वार्षिक सुरक्षा लेखाजोखा उपलब्ध करून घेण्यासाठीही आपण काम करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: Action taken after the conviction of the Dacoit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.