शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दरोड्यामध्ये पोलीस दोषी निष्पन्न झाल्यास कारवाई

By admin | Published: January 08, 2017 12:34 AM

अपहरण, खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अलिबाग पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांना अटक करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस

- जयंत धुळप,  अलिबागअपहरण, खंडणी आणि दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अलिबाग पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांना अटक करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्यात ते पोलीस दोषी निष्पन्न झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, अशी स्पष्टोक्ती रायगडचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केली. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यावर पारसकर यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच सागरी सुरक्षा हा वेगळा आणि महत्त्वाचा विषय या जिल्ह्यात आहे. त्याचा आढावा शुक्रवारी घेऊन त्यातील अपुऱ्या तांत्रिक कर्मचारीवर्गाच्या समस्येचा पाठपुरावा करून, ती व्यवस्था सक्षम करण्याचे काम आपण प्रथम करणार असल्याचे पारसकर यांनी सांगितले. औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगडमधील औद्योगिक कारखान्यांमधील अपघात व संबंधित समस्यांच्या निराकरणाकरिता आवश्यक कारखान्यांचा वार्षिक सुरक्षा लेखाजोखा उपलब्ध करून घेण्यासाठीही आपण काम करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.