नढाळ तलाव बुजविणाऱ्यांवर कारवाई

By Admin | Published: March 21, 2016 01:37 AM2016-03-21T01:37:19+5:302016-03-21T01:37:19+5:30

राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नढाळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला

Action on those who are proud of Nadal lake | नढाळ तलाव बुजविणाऱ्यांवर कारवाई

नढाळ तलाव बुजविणाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext

खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नढाळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला असताना ग्रामपंचायत लोधिवलीतील सर्व सदस्यांनी हा धक्कादायक प्रकार नुकताच चव्हाट्यावर आणला आहे. मुंबईतील धनिकांकडून तलावाच्या क्षेत्रात दगडमातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. यासाठी महसूल विभागाची परवानगी न घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत तहसीलदार अजित नैराळे यांनी या अनधिकृत उत्खनन करून भराव करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी तब्बल ८७ लाखांच्या वर दंड ठोठावण्यात आला आहे .
चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणारा हा पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची चौकशी महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून, त्याचा सविस्तर अहवाल कर्जत लघु पाटबंधारे विभागाकडे मागविण्यात आला आहे.
कर्जत, खालापूर या भागात मुंबईतील धनिकांची फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच जमिनींना सोन्याचा भाव आल्याने स्थानिक दलालांना हाताशी धरून मोक्याच्या आणि जलसाठ्यालगतच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या घटना घडत आहेत.
खालापूर तालुक्याच्या लोधिवली ग्रामपंचायतीच्या नढाळ गावाच्या हद्दीत जवळपास ४० एकरांचा नढाळ पाझर तलाव आहे. अलीकडे या तलावाच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषदेने कोट्यवधी रुपये खर्च केले असून, या तलावाच्या मागील बाजूस तलावालगत मुंबईतील धनिकांनी तलावात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला आहे .
गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दगड मातीचा भराव केल्याने तलावाचे पाणी साठवणुकीचे क्षेत्र अंदाजे ४ एकर कमी करण्यात आले आहे. लोधिवली ग्रामपंचायतीने याबाबत तक्रार तहसीलदारांकडे केल्यानंतर तातडीने चौक मंडळ अधिकारी म्हात्रे, तलाठी संजय जांभळे आदी कार्मचाऱ्यांनी सुरू असलेल्या भरावा ठिकाणची स्थळाची पाहणी करून मोजमापे घेऊन त्याच्या छायाचित्रांसह अहवाल सुपुर्द केला.
यावेळी सर्व्हे नंबर ८१/१ सह उर्वरित जागेत ३०४४ ब्रास इतका अनधिकृत उत्खनन करून भाराव केल्याचे निदर्शनात आल्याने मुंबईतील धनिक तुषार दिनेश मोतीवाला यांना ८७ लाख ९७ हजार ८०० इतका दंड आकारण्यात आला असून, तशी नोटीस त्यांना देण्यात आली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Action on those who are proud of Nadal lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.