म्हसळा: मेंदडी येथील दोन गटातील मारहाण प्रकरणाला चोवीस तास सुद्धा झाले नसताना तालुक्यातील कोळे येथे दोन गटांत देवीच्या पालखीच्या कारणावरून मोठा वाद निर्माण होऊन सरपंच अमोल पेंढारी कुटुंबाला मारहाण झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली. परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारीनुसार एकू ण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोळे येथे काही वर्षांपूर्वी पालखीवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी कुणबी समाजाकडे दीड दिवस पालखी असावी असा तोडगा निघाला आणि सर्वांच्या चर्चेतून वाद मिटलाही, परंतु घरी परतत असताना दोन गटांत बाचाबाची झाली होऊन हाणामारीत झाले. या कारणावरून महेंद्र गोविंद पेंढारी यांनी सरपंच अमोल पेंढारी अन्य १५ जणांविरोधात तर अमोल पेंढारी यांनी रोहित राणे व इतर ११ जणांविरु द्ध म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महेंद्र पेंढारी यांनी दिलेल्या तक्र ारीनुसार शंकर पेंढारी, अमोल पेंढारी, अमित पेंढारी, संकेत पेंढारी, संगीता पेंढारी, दशरथ चाळके, नितीन चाळके, रोशन चाळके, नरेश चाळके, सूर्यकांत चाळके, प्रकाश चाळके, स्वप्निल चाळके, रमेश चाळके अशा १६ जणांविरोधात तक्र ार केली असून अशाच प्रकारची परस्पर विरोधी तक्र ार अमोल पेंढारी यांनी केली आहे. त्यामुळे रोहित राणे, योगेश पाखड, नितीन पाखड, प्रवीण भोगल, महेश राणे, कल्पेश पालांडे, आदिनाथ भोगल, रोहन पेंढारी, विठ्ठल पाखड, सचिन शिगवण, महेंद्र पेंढारी व गोविंद पेंढारी अशा बारा जणांविरूद्ध तक्र ार दखल केली आहे. म्हसळा पोलिसांनी सर्वांविरुध्द मारहाण करणे, जमावबंदीचा आदेश धुडकावणे आदि कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अशाप्रकारचे लहान मोठे गुन्हे तालुक्यात सतत घडत असतात. पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने यातून कसा मार्ग काढायचा ही खरी कसरत पोलीस निरीक्षकांना करावी लागते. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एन. कदम व डी.व्ही. जाधव करीत आहेत. (वार्ताहर)
म्हसळ्यात दोन गटांत हाणामारी
By admin | Published: March 20, 2017 2:13 AM