अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:44 AM2019-01-06T04:44:39+5:302019-01-06T04:45:01+5:30
नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय : पदपथावरील दुकाने हटवणार
नेरळ : शहरात अनधिकृत पार्किं ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून नेरळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच यांनी नेरळ शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सोमवार, ७ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीने शहरात फलक लावून केले आहे.
नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात नगरीकीकरण होत आहे. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारे पार्किंग व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केल्या जातात, त्यामुळे दररोज शहरात वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीवर नेरळ ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बुधवारला आठवडाबाजार भरत असल्याने चालण्यासही जागा नसते. बाजारपेठेतून टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूक करणारे टेम्पो अशी मोठी वाहने येत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने दिवसा व रात्री वाहने पार्क केली असल्यास नेरळ ग्रामपंचायतीमार्फत कार्यवाही म्हणून स्टिकर लावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
च्नेरळ आणि परिसरातील दिवसेन्दिवस लोकसंख्या वाढत आहे. या ठिकाणी अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने वर्दळ वाढली आहे. तुलनेने रस्ते छोटे पडत आहेत. शिवाय, पार्र्किं गसाठीही योग्य सुविधा नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने अवैध
पार्किं गविरोधात मोहीम सुरू केली आहे.
नवनिर्वाचित सरपंच यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; परंतु ही कारवाई कायमस्वरूपी असणार का? की फक्त आठवडाभरापुरती, याअगोदर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती; परंतु चार दिवसांतच ही कारवाई थंडावली आणि पुन्हा नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला, तसेच फुटपाथवर बसणाºयावरही कारवाई करावी, यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
- सुमित क्षीरसागर, स्थानिक, नागरिक
वाहनचालकांवर
फौजदारी गुन्हे
च्नेरळ शहरात नियम मोडणाºया वाहनचालक यांच्यावर फौजदारी गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी ही कारवाई किती दिवस चालणार, हा खरा प्रश्न आहे.
च्मागील काही महिन्यांपूर्वीही अशीच कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती; परंतु आठवडाभरातच ही कारवाई थंडावल्याने परिस्थिती जैसे थेच झाली आहे.
च्तसेच नेरळ बाजारपेठेतील फुटपाथवर बसलेल्या भाजी-विक्रे त्यांवरही कारवाई करून त्यांना नेरळ व्यापारी संकुल येथे बसण्यास सांगितले होते; परंतु पुन्हा भाजी विक्रे त्यांनी आपले बस्तान पदपथावर थाटले आहे.