पनवेल:स्वातंत्र दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.पनवेल मध्ये भारत स्कुल ऑफ आर्टच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानक परिसरात कलाकाराचं क असलेला अनोखा देखावा साकारून रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांचे झेंड्याचे कलेक्शन सेंटर उभारून देशाचा अभिमान असलेला तिरंगा उघडयावर फेकून न देता या संस्थेने एकत्रित केला.
यावेळी भारत स्कुल ऑफ आर्टच्या कलाकारांनी साकारलेली कलाकारांची प्रतिकृती पाहाण्यासाठी मोठी गर्दी याठिकाणी जमली होती. वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट उभारणाऱ्या कलाकारांना समर्पित करणारे हे आर्ट होते. स्वतंत्र दिन विशेष म्हणुन हा "क" कलाप्रेमीच्या भेटीसाठी उभारला असल्याचे भारत स्कुल ऑफ आर्टचे विवेक पडवळ यांनी सांगितले.याठिकाणचा क हा पूर्ण आकारात नसून अपूर्णत्वात आहे. आपल्या विचारांना आपल्या मतांना मुक्त होऊ देणं गरजेचं आहे.
स्वतंत्र विचार हा एक खूप मोठा बदल आहे. हा बदल तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण मुक्त विचार करू मुक्त पद्धतीत विचार मांडू असाच मुक्त विचार हा "क" मांडतो या उद्देशाने ही कलाकृती उभारली आहे.पनवेल पासून दहा बारा किलोमीटर वर असणाऱ्या दुदरे पाडा या गावात रहाणाऱ्या आणि भारत स्कुल मध्ये शिकणाऱ्या सिद्धेश्वर नाथा चौधरी याने हि कलाकृती साकारली आहे. ही कलाकृती यापुर्वी मुबंई मध्ये होणार "काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल आणि नीता अंबानी जिओ वर्ड सेंटर मध्ये उभारली होती.पनवेलच्या कलाकारांनी तयार केलेली कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.