- मधुकर ठाकूरउरण : केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जेएनपीटी बंदरात मागील चार दिवसांपासून अडकून पडलेल्या कांद्याच्या प्रत्येक रिफर कंटेनरसाठी निर्यातदारांना प्रतिदिन पंधराशे रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे. कांदा निर्या$तीसाठी मोजाव्या लागणाऱ्या या अतिरिक्त जादा खर्चामुळे निर्यातदार हैराण झाले आहेत.केंद्र सरकारने सोमवारपासून तडकाफडकी कांदा निर्यातबंदी लादली आहे. या निर्यातबंदीमुळे जेएनपीटी बंदरातून युरोप आणि मिडल ईस्ट येथे निर्यातीसाठी आलेले कांद्याचे १६२ कंटेनर बंदरात अडकून पडले आहेत. जेएनपीसीटी बंदरासह अंतर्गत असलेल्या अन्य तीन खासगी बंदरांतील प्रत्येक कंटेनरमध्ये २५ टनप्रमाणे एकूण ३८८८ मेट्रिक टन कांदा पडून असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली.निर्यातीसाठी पाठविण्यात येणारा कांदा इच्छित ठिकाणी सुस्थितीत पोहोचण्यासाठी निर्यातदार कंपन्या रिफर कंटेनरचा वापर करतात. त्यासाठी बंदर आणि जहाजातही वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. यासाठी विविध कंपन्यांकडून वेगवेगळे दर आकारले जातात.दरम्यान, निर्यातदारांना रिफर कंटेनरसाठी आणखी किती दिवस अतिरिक्त दर आकारावे लागणार, याची कल्पना नसल्याने निर्यातदारांमध्ये चिंता पसरलीआहे.इतके आहेत कंटेनरसोमवारपासून निर्यातीची तयारी सुरू असतानाच जेएनपीटी बंदरात १६२ कांद्याचे कंटेनर अडकून पडले आहेत. यामध्ये जेएनपीटीच्या जेएनपीसीटी बंदरात-७ तर खासगी जीटीआय-१५१, एनएसआयसीटी-१, एनएसआयजीटी-३ कंटेनरचा समावेश असल्याची माहिती जेएनपीटीच्या वाहतूक नियंत्रण कक्षातून देण्यात आली.
कांद्याच्या रिफर कंटेनरसाठी १५०० रुपये अतिरिक्त भाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:47 AM