आदगाव किनारी शार्क माशाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:11 AM2021-03-03T00:11:52+5:302021-03-03T00:12:30+5:30

मच्छीमार, वनविभागाने केली सुटका ;  दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश

Adgaon shore shark fish gave life | आदगाव किनारी शार्क माशाला दिले जीवदान

आदगाव किनारी शार्क माशाला दिले जीवदान

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव समुद्रकिनारी आलेल्या अवाढव्य शार्क माशाला येथील वनविभाग व मच्छीमारांनी जीवदान दिल्याची घटना मंगळवारी घडली आहे. 
तालुक्यातील सर्वा मार्गे दिघीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सायंकाळच्या वेळी आदगाव समुद्रामध्ये होणाऱ्या भरती - ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेल्या जवळपास दहा फुटांपेक्षा जास्त लांबीच्या अवाढव्य शार्क व्हेल माशाला पुन्हा सुखरूप  समुद्रामध्ये सोडण्यात आदगाव येथील बाळकृष्ण पावशे, मधुकर दोडकुलकर, लाया दोडकुलकर, धनेश चोगले व काशिनाथ चोगले यांसह आठ ते दहा कोळी बांधवांना दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी यश आले आहे. 
श्रीवर्धनमधील भरडखोल, आरावी, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यावर मागील काळात मृत मासा सापडलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी आदगाव येथील किनाऱ्यावर आलेल्या जिवंत शार्क माशांबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी पहिल्या दिवशी किनाऱ्यालगत  सुमारे १२ ते १५ फुटांचा शार्क व्हेल मासा शरीराच्या हालचाली कमी होत असताना पाण्यात जाण्यासाठी धडपडत असल्याचे पाहावयास मिळाले. लगेचच  किनाऱ्यावरील कोळी बांधवांनी एकत्र येत त्याला पाण्यात सोडण्याचे साहस दाखवले. त्यानंतर त्याच्या शरीराच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी मंगळवारी हाच मासा बंदरातील आतील भागात जाळ्यात अडकून सुटकेसाठी धडपडत असल्याचे दिसले. याची माहिती वनविभागाला समजताच एम. डी. राऊत, एस. के. उतेकर, एस. डी. ठाकरे, बी. पी. राठोड या वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी परत एकदा येथील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्या शरीराभोवती  असणारे जाळे त्याला कुठलीही इजा न करता काढण्यात आले.
श्रीवर्धनमधील भरडखोल, 
आरावी, 
दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यावर मागील काळात मृत मासा सापडलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, यावेळी आदगाव येथील किनाऱ्यावर आलेल्या जिवंत शार्क माशांबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोळी बांधवांमुळे या माशाचे प्राण वाचले.

Web Title: Adgaon shore shark fish gave life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.