अलिबागमध्ये लवकरच स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करणार- आदिती तटकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:22 AM2020-05-30T01:22:57+5:302020-05-30T01:23:29+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठकीत सूचना
अलिबाग : अलिबाग येथे स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, लवकरच ही लॅब अलिबागमध्ये सुरू होईल. कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची स्वॅब टेस्ट करण्यासाठी होणारा खर्च जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात येणार आहे. सरकार आणि प्रशासन आपल्या पाठीशी आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सर्व प्रकारची काळजी घेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर किंवा इतर कर्मचाºयांच्या सेवा कोविड-१९ च्या कामकाजासाठी रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात दिल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोविड-१९ रुग्णालये, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड उपचार केंद्र या ठिकाणच्या आरोग्य सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये याची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांची यादी सादर करावी. तसेच जिल्ह्यातील अॅम्ब्युलन्स वाहनचालकांचे प्रबोधन करून त्यांना धैर्य देऊन ते कोविड रुग्णाला नेण्यासाठी नकार देणार नाहीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी मिळून प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या. येणाºया पुढील काळासाठी सर्व जण एकजुटीने खंबीरपणे उभे राहू या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.रुग्णवाहिका चालकाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी : कोरोनाबाधित रुग्णांना ने-आण करण्यासाठी अॅम्ब्युलन्सच्या वाहनचालकांना सुरक्षेविषयी लागणाºया आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाºया, मात्र कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यामुळे कामावर न जाऊ शकणाºया कर्मचाºयांचे वेतन संबंधित आस्थापनांनी कपात करू नये, असे पत्र प्रशासनाकडून देण्यात यावे.