Maharashtra election 2019 : वडिलांनी पराभूत केलेल्या उमेदवाराशी आता आदिती यांचा होणार सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:19 AM2019-10-16T06:19:59+5:302019-10-16T06:46:23+5:30

रायगडचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याभोवती फिरत आहे.

Aditi will now face a candidate defeated by his father | Maharashtra election 2019 : वडिलांनी पराभूत केलेल्या उमेदवाराशी आता आदिती यांचा होणार सामना

Maharashtra election 2019 : वडिलांनी पराभूत केलेल्या उमेदवाराशी आता आदिती यांचा होणार सामना

googlenewsNext

आविष्कार देसाई।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती असलेले शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांच्याशी त्यांची लढत होते आहे. सुनील तटकरे यांनी विनोद घोसाळकर यांचा १९९५ आणि १९९९ मध्ये पराभव केला होता. वडिलांनी पराभवाची धूळ चारलेल्या उमेदवाराशी आता मुलीचा सामना होणार आहे.


येथे आधी आदिती यांचे चुलत भाऊ अवधूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. घराण्यातील अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीला रामराम ठोकून ते सध्या गेले आहेत. या मतदारसंघात त्यांच्याच नावाची चर्चा होती; परंतु त्यांनी माघार घेतल्याने घोसाळकर यांचे नाव पुढे आले.
रायगडचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याभोवती फिरत आहे. अवधूत तटकरे आमदार असताना त्यांनीही या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी शिवसेनेवर आली आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे यांना सुमारे ३१ हजारांचे मताधिक्य दिले होते.


जमेच्या बाजू
वडील सुनील तटकरे यांचे राजकीय प्राबल्य, त्यांनी केलेली कामे, शेकाप आणि काँग्रेसची असलेली साथ महत्त्वाची. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद स्वीकारताच आदिती यांनीही श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहे, म्हसळा या ठिकाणी उभे केलेले पक्षीय संघटन महत्त्वाचे ठरेल. युवती काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष म्हणून काम. तरुण असल्याने युवा पिढीसाठी आश्वासक चेहरा. त्यामुळे नवमतदारांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा.
विनोद घोसाळकर यांनी १९९५ आणि १९९९ साली येथून निवडणूक लढवली होती. सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील यांच्या राजकीय खेळीची घोसाळकर यांना चांगलीच माहिती आहे. अवधूत तटकरे यांचा आणि नावेद अंतुले यांचा पक्षप्रवेश घडवल्याचा फायदा मिळण्याची अपेक्षा. संघटना म्हणून शिवसेनेने आजवर या भागात केलेल्या कामाचा फायदा मिळण्याची चिन्हे. राष्ट्रवादीला अडचणीत आणणारा प्रचार.

उणे बाजू
आदिती या प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे नवख्या उमेदवार असा प्रचार. वडील सुनील तटकरे यांच्या राजकीय वारशाचे प्राबल्य. त्यामुळे घराणेशाहीची टीका. त्यातच कौटुंबिक वादातून चुलत भाऊ अवधूत यांनी पक्ष सोडून शिवसेनेची साथ दिली. त्यांना तटकरे यांची कार्यपद्धती ठाऊक असल्याने त्याचा फटका बसण्याची भीती. खुद्द आदिती यांच्यावर फारशा संपर्कात नसल्याचा आक्षेप.
घोसाळकर तब्बल २० वर्षांनंतर रायगड जिल्ह्यातून लढत आहेत. त्यामुळे आयात केलेला उमेदवार असा शिक्का. मतदारसंघात विश्वास संपादन करण्यास पुरेसा वेळ आता नाही. सुनील तटकरे यांनीच त्यांना दोन वेळा पराभूत केलेले आहे. घोसाळकरांच्या कुटुंबातील सदस्यांना विविध पदे मिळाली आहेत. त्यात नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यापासून विविध पदांचा समावेश असल्याने त्यांच्यावरही घराणेशाहीचा शिक्का.

Web Title: Aditi will now face a candidate defeated by his father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.