अतिक्रमणधारकांना प्रशासनाचे अभय

By admin | Published: July 26, 2016 04:59 AM2016-07-26T04:59:01+5:302016-07-26T04:59:01+5:30

सरकारी जागेवर अतिक्र मण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही पेण तहसीलदारांनी टाळाटाळ केली आहे. कारवाई होण्याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही

Administration abduction of encroachers | अतिक्रमणधारकांना प्रशासनाचे अभय

अतिक्रमणधारकांना प्रशासनाचे अभय

Next

अलिबाग : सरकारी जागेवर अतिक्र मण करणाऱ्या पोलिसांवर जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही पेण तहसीलदारांनी टाळाटाळ केली आहे. कारवाई होण्याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याची खंत पेण येथील नागरिक दत्तात्रेय मोकल यांनी व्यक्त केली.
महसूल प्रशासनाला अधिकृत माहिती असूनही गेल्या वर्षभरात केवळ पंचनामा करण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली नाही, अशी व्यथा अलिबाग येथील तुषार विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोकल यांनी मांडली. पेण तालुक्यातील काश्मिरेवाडी गट नं. २/१ वन विभागाची ५.२१ हे.आर. सरकारी मिळकत आहे. या मिळकतीपैकी काही जागेमध्ये पोलीस जमादार विठ्ठल देवजी कोळी यांचा भाऊ आत्माराम देवजी कोळी यांनी बेकायदा बांधकाम सुरु केले आहे. बांधकाम करताना मळेघर ग्रामपंचायतीची कोणतीही बांधकाम परवानगी त्यांनी घेतली नसल्याचे दत्तात्रेय मोकल यांनी सांगितले. बेकायदेशीर बांधकामाबाबत कारवाई करण्यासंदर्भात पेणच्या वनक्षेत्रपाल अधिकारी आणि पेण तहसीलदारांकडे २४ एप्रिल २०१५ रोजी लेखी तक्र ार केली होती. गट नं. १/१ ही जागा संरक्षित वने अशी आहे. महसूल खात्याने सरकारी दफ्तरी चुकीची नोंद घेतली आहे. या सरकारी जमिनीवरील अतिक्र मणे दूर करून ही २/१ ही सरकारी मिळकत वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी, असे वनविभागाकडून सांगण्यात आल्याचे दत्तात्रेय मोकल यांनी सांगितले.
मंडळ अधिकारी पेण यांनी दिलेल्या माहिती व अहवालानुसार विठ्ठल देवजी कोळी व आत्माराम देवजी कोळी यांनी गट नं. २/१ सरकारी ५.२१ या जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याचे सिद्ध झाले. विठ्ठल देवजी कोळी यांनी सदरचे बांधकाम हे पत्नीच्या नावे असल्याचे मान्य केले. हे बांधकाम बंद करीत असल्याचा जबाब मंडळ अधिकाऱ्यांच्या समक्ष लिहून दिला, असेही मोकल यांनी सांगितले.
रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे अनधिकृत बांधकामासंदर्भात लेखीतक्र ार केली होती. जिल्हाधिकारी यांनीही काश्मिरेवाडी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, असे आदेश पेण तहसीलदारांना दिले होते.

नोटीस बजावली
- तहसीलदार पेण यांच्याकडून विठ्ठल कोळी व आत्माराम देवजी कोळी यांना बेकायदेशीर बांधकाम तात्काळ दूर करावे अशी नोटीस देण्यात आली. नोटीस बजावून देखील बेकायदा बांधकाम हे
सुरु च ठेवले आहे.

भूमी अभिलेख विभागाला सदर जागेची मोजणी करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यावर बांधकाम तोडण्याबाबत कारवाई केली जाईल. कायदा मोडणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही.
- वंदना मकू, तहसीलदार, पेण

Web Title: Administration abduction of encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.