वारांगनांना प्रशासनाची मदत, समाजातील उपेक्षित घटक; रेशन किट्स उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:27 AM2020-04-27T01:27:38+5:302020-04-27T01:27:46+5:30

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या महिलांना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करीत रेशन किट्स उपलब्ध करून दिले आहेत.

Administration assistance to prostitutes, neglected elements of society; Ration kits available | वारांगनांना प्रशासनाची मदत, समाजातील उपेक्षित घटक; रेशन किट्स उपलब्ध

वारांगनांना प्रशासनाची मदत, समाजातील उपेक्षित घटक; रेशन किट्स उपलब्ध

Next

निखिल म्हात्रे
अलिबाग : वारांगना हा घटक समाजातील अत्यंत दुर्लक्षित, उपेक्षित असा आहे, ज्याच्याकडे सर्वसामान्य नागरिक जाण्यास धजावत नाहीत. या महिला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करून जीवन जगत आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या महिलांना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात पुढे करीत रेशन किट्स उपलब्ध करून दिले आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने समाजातील हा घटक मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाकडून सर्व कष्टकरी, मजूर नागरिकांना विविध प्रकारच्या माध्यमातून मदत होत आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत आहे; परंतु या महिलांकडे या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्या शासनाच्या या लाभापासून वंचित आहेत, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी ही बाब जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी चौधरी यांनी तत्काळ जिल्ह्यात या महिला कोठे आहेत, किती आहेत याची सविस्तर माहिती घेण्याचे गायकवाड यांना आदेश दिले.
पनवेल तहसीलदार अमित सानप यांनीही तत्परतेने कार्यवाही करत या महिलांनासाठी रेशन किट्स उपलब्ध करून दिले. या उपक्र मात महिलांसाठी काम करणाऱ्या आश्रय सोशल फाउंडेशन पनवेल अध्यक्ष अशोक गायकवाड, दीप्ती रामरामे, तालुका संरक्षण अधिकारी कैलास डोईफोडे, सहायक तालुका संरक्षण अधिकारी व नायब तहसीलदार आदमाने यांचे सहकार्य लाभले.
>पनवेल शहर, महामार्गालगत १७५ ते २०० महिला
गायकवाड यांनी या गोष्टीचा शोध घेतला असता त्यांना पनवेल शहर, मुंबई-पुणे महामार्गालगत साधारणत: १७५ ते २००
महिला आढळून आल्या. या महिलांची यादी व मदतीचा
प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना
सादर केला. त्यांनी विनाविलंब पनवेल तहसीलदार अमित सानप यांना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गायकवाड यांच्याशी समन्वय साधून या महिलांना रेशन कार्ड, आधार कार्डची सक्ती न करता आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

Web Title: Administration assistance to prostitutes, neglected elements of society; Ration kits available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.