अलिबाग : अनंत चतुर्दशीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार ४०३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने १५३ सार्वजनिक आणि १७ हजार २६० गणेशमूर्तींचा समावेश आहे. ठिकठिकाणी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुका निर्विघ्न पार पडाव्यात, यासाठी स्थानिक पातळीवर संबंधित पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नगरपालिकेने समुद्रकिनारी लाइफगार्डही तैनात केलेआहेत. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावरूनही विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने १२ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजल्यापासून ते १३ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजेपर्यंत महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची चांगलीच धूम जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये दिसून आली, त्यामुळे भक्तांमध्ये कमालीचे नवचैतन्य निर्माण झाल्याने वातावरण चांगलेच भक्तिमय झाले होते. गौरी-गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या घरी परतले असले, तरी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करण्यात येणाºया बाप्पाच्या मूर्तींची संख्या अधिक आहे. त्यामुळे अजूनही काही प्रमाणात चाकरमानी बाप्पाच्या उत्सवात मग्न असल्याचे दिसून येते.
१२ सप्टेंबर रोजी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यानंतरच खºया अर्थाने गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. यासाठी स्थानिक पातळीवरील पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. यामध्ये ७६ पोलीस अधिकारी, ६५३ कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून २ एसआरपी प्लाटून, स्ट्रायकिंग फार्स, ३५० होमगार्डचा सामावेश आहे. विसर्जन मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा असणारे फळविक्रेत, भाजीविक्रेते, विविध खाद्यपदार्थांचे असणारे स्टॉल हटवण्यात आले आहेत.
अलिबागमध्येही मोठ्या संख्येने सार्वजनिक आणि खासगी गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने विसर्जनस्थळी जाणारे मार्ग एक दिशा करण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी विसर्जन मिरवणुकीच्या वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहनांनाही अटकाव करण्यात आला आहे. समुद्रकिनारी क्रीडा भुवन आणि जेएसएम महाविद्यालयाच्या मैदानाजवळ खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.बाप्पाच्या निरोपासाठी श्रीवर्धनमध्ये चोख नियोजन
1) विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या निरोपाची तयारी करण्यासाठी श्रीवर्धनमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व सर्वसामान्य जनता यांनी जोरदार तयारी केली आहे. श्रीवर्धनमधील बाजारात नैवेद्य व उत्सव समाप्तीसाठी लागणाºया साहित्यासाठी लोकांची गर्दी केली आहे. गुरु वारी होणाºया गणेश विसर्जन व मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य दक्षता घेण्यात येत आहे. श्रीवर्धन पोलीस दल व अतिरिक्त पोलिसांची नेमणूक मिरवणुकीसाठी करण्यात आली आहे. होमगार्ड, रेल्वे पोलीस व स्थानिक दल असे ४० कर्मचारी व तीन अधिकाऱ्यांचा ताफा सुरक्षेसाठी नियुक्त केला आहे.
2) श्रीवर्धन नगरपरिषदेने निर्मल्यासाठी समुद्रकिनाºयावर विविध ठिकाणी कचरापेट्या ठेवल्या आहेत. नगरपरिषदेच्या जीवरक्षकवर्गाला सकाळपासून ते विसर्जन होईपर्यंत थांबण्याचे आदेश मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. नगरपरिषदेची स्वच्छतेसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. गणेश मिरवणुकी दरम्यान गणेशभक्तांना वाहतुकीसाठी त्रास होऊ नये यासाठी श्रीवर्धन शहरातील एसटी वाहतूक सायंकाळी बंद ठेवण्यात आली आहे. श्रीवर्धन शहरात तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. श्रीवर्धन एसटी स्टॅण्डमार्गे शिवाजी चौक, सोमजाई मंदिर, आंबेडकर चौक ते श्रीवर्धन समुद्रकिनारा असा मिरवणुकीचा नियोजित मार्ग ठरवण्यात आला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अतिरिक्त पोलीस दल श्रीवर्धनमध्ये तैनात आहे. जनतेने शांततेत उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. - प्रमोद बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकसमुद्रकिनाºयावर नगरपरिषदेकडून स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरत्या काळासाठी निर्माण केलेल्या कचरापेटी ठेवल्या आहेत. विसर्जनानंतर स्वच्छता दिसावी, यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे. - किरणकुमार मोरे, मुख्याधिकारीश्रीवर्धनमधील गणेशोत्सवसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून पर्यटक येतात, त्या दृष्टीने नगरपरिषदेने योग्य रचनात्मक व्यवस्था निर्माण केली आहे. नगरपरिषदेच्या कर्मचाºयांना योग्य सूचना दिल्या. - जितेंद्र सातनाक, प्रभारी नगराध्यक्ष, श्रीवर्धनअलिबागमध्ये निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाअलिबाग नगरपालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. समुद्रामध्ये विसर्जन करताना अपघात होऊ नये, यासाठी बचाव कार्यासाठी पथक तैनात केले आहे. त्यामध्ये लाइफगार्डचा समावेश आहे. गणेशभक्तांना सातत्याने सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपकांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदीमुंबई-गोवा महामार्गावरून गणेशमूर्ती विसर्जनाच्या काही मिरवणुका निघणार आहेत, त्यामुळे त्यांना कोणताच अडथळा होऊ नये यासाठी १२ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजल्यापासून ते १३ सप्टेंबरच्या दुपारी १२ वाजेपर्यंत महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.