पनवेल/अलिबाग : शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा शाळा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय सुरू करू नयेत तसेच अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गटशिक्षणाधिकारी यांनी आरटीई कायद्याप्रमाणे व महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार उचित कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पालकांनी आपल्या पाल्यास अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे या अनधिकृत प्राथमिक शाळांत प्रवेश घेऊ नये, असेही अवाहन शिक्षणाधिकाºयांकडून करण्यात आले आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालक जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांनी कळविले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.या शाळांचा समावेशया अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये १)वेदांत पब्लिक स्कूल, कळंबोली, पनवेल, २)ए.डी. कोली शिक्षण प्रसारक संस्था, ज्ञानाई माध्यमिक विद्यालय धामणी, पनवेल, ३) शारदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल, पनवेल, ४) पराशक्ती इंग्लिश मीडियम स्कूल, कोपर, पनवेल, ५) कळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल, तळोजे, पाचनंद, पनवेल, ६) अकर्म इंग्लिश स्कूल, तळोजे, पनवेल, ७) मार्शमेलो इंटरनॅशनल स्कूल, ओवे, पनवेल, ८) म्हात्रे चॅरिटेबल संस्था, इंग्लिश मीडियम स्कूल, मोरा,उरण, ९) बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल, करंजा रोड, उरण, १०)डॉ. ए.आर. उंड्रे इंग्लिश मीडियम स्कूल, बोर्ली, मुरूड, ११) मोहन धारिया इंग्लिश मीडियम स्कूल, वरंध, महाड, १२) आयडियल इंग्लिश स्कूल, महाड, १३) इकरा इस्लामिक स्कूल अॅण्ड मकतब इकरा स्कूल, म्हसळा, १४) इतकान एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सोसायटी, इतकान इंग्लिश स्कूल, गोंडघर, म्हसळा, १५) इकरा एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल, लिपनी वावे, उर्दू, पो. पांगळोली, म्हसळा, १६) श्री. सुरेश कुडेकर एज्युकेशन सोसायटी, सुरेश जी. कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा, १७) कोकण एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर सेंटर, अल हसन इंग्लिश स्कूल, म्हसळा, १८) एंजल न्यू इंग्लिश स्कूल, कशेळे, कर्जत, १९) शार्विल सीबीएससी स्कूल आॅफ एक्सलन्स, नेरळ, कर्जत या शाळांचा समावेश आहे.