शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कुपोषित बालकांना ‘रोटरी’ने घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:39 PM

औषधोपचाराची स्वीकारली जबाबदारी; कर्जतमधील अतितीव्र कुपोषित ४५ बालकांना देणार पोषण आहार

कर्जत : कर्जत तालुका कुपोषणग्रस्त ओळखला जातो. या तालुक्यात असलेले कुपोषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जात आहेत. मात्र तरीदेखील ४५ बालके ही अतितीव्र कुपोषित असून त्यांच्यासाठी शासनाने कर्जत ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू केले आहे. रोटरी क्लबच्या कर्जत शाखेने कर्जत तालुक्यातील अतितीव्र कुपोषित असलेली सर्व ४५ बालके यांची जबाबदारी स्वीकारली असून त्यांना दत्तक घेतले आहे. त्या सर्व बालकांच्या पोषण आहाराची आणि औषधोपचार यांची जबाबदारी स्वीकारल्याने भावी काळात तालुक्यातील कुपोषण कमी होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या बाल उपचार केंद्रात १३ बालके दाखल आहेत. कर्जत तालुक्यात कुपोषण प्रश्नावर काम करणाऱ्या दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाºया पोषण सेवांवर देखरेख प्रकल्पामार्फत केलेल्या पाठपुराव्यानंतर आणि रायगड जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात बालउपचार केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली होती. सध्या या बालउपचार केंद्रात १३ तीव्र कुपोषित श्रेणीतील बालके उपचार घेत आहेत. या सर्व बालकांना पूरक पोषण आहार आणि इतर आवश्यक मदत करण्याचे आवाहन दिशा केंद्रामार्फत केले जात आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत रोटरी क्लबच्या बाल उपचार केंद्रात दाखल असलेल्या १३ बालकांना चादर, साबण, तेल, पेस्ट, ब्रश या सह शेंगदाणे लाडू, राजगीरा लाडू, चिक्की या सह कोरडा आहार वाटप करण्यात आला. त्या सर्व १३ आणि तालुक्यातील एकूण ४५ कुपोषित बालकांची जबाबदारी कर्जत रोटरीच्या वतीने घेण्यात आली आहे. यावेळी तालुक्यातील सर्वच कुपोषित बालकांना रोटरी क्लबच्या वतीने मदत करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लब कर्जतचे प्रमुख हुसेन जमाली यांनी दिली. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांचे उपस्थितीत रोटरी क्लब कर्जतचे अध्यक्ष हुसेन जमाली यांच्यासह रोटरी क्लब सदस्यांसह एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर, दिशा केंद्राचे कार्यकर्ते आणि पोषन हक्क गटाचे समन्वयक अशोक जंगले आदी उपस्थित होते. त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी यांनी रोटरीकडून कुपोषित बालके दत्तक घेण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.आपण स्वत: वैद्यकीय सेवा करतो, पण मला ज्या वेळेस कुपोषित मुलांना मदत करण्याची संधी मिळते त्या त्या वेळी तातडीने मदत करण्याचे मान्य केले आहे. रोटरी क्लबवतीने आपण औषधे उपलब्ध करून दिली आहेत, यापुढे देखील आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल आणि यापुढेही शक्य होइल तेवढी मदत देखील करू.- डॉ. मनोहर साबणे, रोटरीयनरोटरीच्या वतीने तालुक्यातील ४५ कुपोषित बालकांना आम्ही आमची सामाजिक बांधिलकी समजून दत्तक घेतले आहे. सर्वच बालकांना आमच्या वतीने वस्तुरूपी मदतीसह आरोग्य सेवा देण्याचा सुध्दा आमचा प्रयत्न असेल. सीटीसी संपल्यानंतरसुध्दा गावोगावी जाऊन पालकांचे मेळावे घेऊन कुपोषणाच्या विरोधी जनजागृती केली जाईल.- हुसेन जमाली, अध्यक्ष,कर्जत रोटरी क्लब