शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पोलादपूरमध्ये ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ पंधरवडा

By admin | Published: May 25, 2017 12:20 AM

पोलादपूर तालुक्यातील शेतकरी समृद्ध आणि शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी तालुका कृषी कार्यालय प्रयत्नशील असून, उन्नत शेती समृद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पोलादपूर तालुक्यातील शेतकरी समृद्ध आणि शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी तालुका कृषी कार्यालय प्रयत्नशील असून, उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवड्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विजय पांढरे यांनी दिली.पोलादपूर तालुक्यात १ मे ते ८ जून २०१७पर्यंत शेतकरी कार्यशाळांचे आयोजन करण्याचा संकल्प तालुका कृषी कार्यालयामार्फत हाती घेण्यात आला असून, आतापर्यंत कापडे बुद्रुक, सडवली, बोरघर, मोरिगरी, ताम्हाणे, गोळेगणी, पळचिल, मोरसडे, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, देवळे, माटवण, वझरवाडी, चरई या गावांमध्ये शेतकरी बैठकांद्वारे विविध योजनांची माहिती, ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ पंधरवड्यानिमित्त देण्यात आली. यामध्ये पिकांची उत्पादकता वाढ, पीकनिश्चिती, पीककर्जापेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न घेणे, शेतीमालाला बाजारपेठ, काढणीपश्चात तंत्रज्ञान, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण आदी माहिती या वेळी तालुका कृषी अधिकारी पांढरे यांनी दिली.येत्या २५ मे ते ८ जून या, ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ पंधरवड्यानिमित्त गावनिहाय प्रशिक्षण, कृषी सहायकांमार्फत प्रत्येकी २ पीक प्रात्यक्षिके, गावनिहाय कृषी वार्ताफलक, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन, तालुक्यातील एकत्रित शेतकरी प्रशिक्षण व कार्यशाळा पोलादपूर शहरातील कॅप्टन विक्र मराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या वेळी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, प्रगतशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि नवनवीन तंत्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याचे पांढरे यांनी सांगितले.येत्या डिसेंबर २०१७ अखेरीस कृषी विभागाच्या वेबसाइटद्वारे ठिबक सिंचनाच्या लाभार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून, इच्छुकांनी आॅनलाइन अर्ज करण्याचे आवाहन पांढरे यांनी केले आहेत.