कर्जतमधील पाण्याच्या टाक्यांची १२ वर्षांनंतर स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 01:40 AM2019-12-02T01:40:28+5:302019-12-02T01:40:43+5:30

शहराला आता साठवण टाकीतून स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळू लागले आहे.

After 5 years cleaning of water tanks in debt | कर्जतमधील पाण्याच्या टाक्यांची १२ वर्षांनंतर स्वच्छता

कर्जतमधील पाण्याच्या टाक्यांची १२ वर्षांनंतर स्वच्छता

Next

- विजय मांडे

कर्जत : कर्जत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या नळपाणी योजना अस्तिवात आल्यापासून स्वच्छ करण्यात आल्या नव्हत्या. मात्र, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याबाबत विषयावर त्याचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर सर्व टाक्या स्वच्छ केल्या जात आहेत. साधारण सहा इंच मातीचा थर प्रत्येक टाकीमध्ये आढळून आल्याने आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागदेखील टाक्यांची स्वच्छता केल्याने काहीसा आनंददायी झाला आहे. शहराला आता साठवण टाकीतून स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळू लागले आहे. १२-१३ वर्षांनंतर या टाक्या स्वच्छ करण्यात आल्याने नागरिकदेखील शुद्ध पाण्याचा वापर करता येत असल्याने आनंदी आहेत.
कर्जत शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९९८ मध्ये वाढीव नळपाणी योजना तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारने मंजूर केली होती. या नळपाणी योजनेतून शहरातील सर्व भागांना पाणी पुरवठा केला जात असून आकुर्ले, गुंडगे, भिसेगाव, विश्वनगर आणि टेकडी आदी ठिकाणी साठवण टाक्या आहेत. त्या साठवण टाक्यांमध्ये पाणी आल्यानंतर ते पुढे वितरित केले जाते. दहिवली समर्थनगर भागात असलेल्या जल शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध करण्यात आलेले पाणी पुढे साठवण टाकीत पोहोचते. त्या सर्व टाक्यांमधून पाणी शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविले जाते. त्या वेळी सर्व नागरिक हे शुद्ध पाणी मिळते म्हणून खूश असायचे; परंतु साठवण टाक्यांची अनेक वर्षे स्वच्छता केली जात नसल्याने १९ वर्षांच्या पावसाळ्यात गोळा होणारा गढूळ पाण्याचा गाळ साठवण टाकीत दर वेळी साठून राहायचा. पावसाळ्यात तर नळाद्वारे येणाºया गढूळ पाण्याने नागरिक हैराण होत होते. साथीचे आजारदेखील दरवर्षी कर्जत शहरातील काही भागात दूषित पाण्यामुळे परसत होते.
ही नेहमीची समस्या लक्षात घेऊन कर्जत शहरात साथीच्या आजारांवर अभ्यास करणाºया सुवर्णा केतन जोशी या कर्जत शहराच्या प्रथम नागरिक म्हणजे नगराध्यक्ष झाल्या. त्यांनी पाणीपुरवठा योजनेचे पाणीगळतीचे प्रमाण रोखण्यासाठी गेले वर्षभर नियोजनपूर्वक केलेले प्रयत्न यामुळे शहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा ही समस्या दूर झाली. त्यांनी पालिका सभागृहाला विश्वासात घेऊन शहरातील नागरिकांना २४ तास पाणी दिले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याआधी त्यांनी कर्जत शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या या स्वच्छ करण्याचा विषय सभागृहात ठेवला. वेगवेगळ्या सहा ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा ठेका देण्यात आला होता. मात्र, मागील काही महिन्यांत असलेल्या निवडणुका यामुळे तो विषय मागे पडला होता.

चार टाक्यांमधील गाळ काढला
शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची पाणीकपात न करता पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. आतापर्यंत चार पाणी साठवण टाक्यांतील गाळ काढून त्या स्वच्छ केल्या गेल्या आहेत. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, पाणी पुरवठा सभापती संचिता संतोष पाटील आणि पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे, पाणी पुरवठा अभियंता अशोक भालेराव यांनी साठवण टाक्यांची स्वच्छतेचे काम होताना त्या ठिकाणी पाहणी सुरू ठेवली आहे.
सकाळच्या सत्रात पाणी देऊन झाल्यावर एका दिवशी एक याप्रमाणे गुंडगे, विश्वनगर, आकुर्ले येतील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्या आणि त्या टाकीतून विनाअडथळा दुसºया दिवशी सकाळी पाणी सोडले गेले आहे. टाक्यांमध्ये साठलेला साधारण ६ इंच पर्यंत पोहोचलेला गाळ टाकीतील पाणी पंप लावून बाहेर काढण्यात आले. तीन टाक्या केवळ एक दिवसात तर कचेरी येथील मोठी टाकी दोन दिवसांत स्वच्छ केली गेली आहे. आता भिसेगाव येथील आणि कॉलेज रोड येथील पाण्याची
टाकी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

आम्ही शहराला शुद्ध पाणी देतो, मग आरोग्याचे प्रश्न का निर्माण होतात हे सतत सतावत होते. टाक्यांमध्ये पाच ते सहा इंच मातीचा थर निर्माण झाल्याचे लक्षात आल्याने तत्काळ पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षदेखील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या पाहिजेत, यासाठी आग्रही होत्या.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, कर्जत

कर्जत शहरात साथीचे आजार प्रामुख्याने पावसाळ्यात बळावत होते, ते दूषित पाण्यामुळे होत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे आम्ही पाणी शुद्ध करून देऊन अडचण का निर्माण होते याचा शोध घेतला. त्या वेळी पाण्याच्या टाक्या योजना तयार केल्यापासून एकदाही स्वच्छ केल्या नव्हत्या. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित करून सर्व पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या जात आहेत.
- सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, कर्जत

शहरातील नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहोत. पालिका नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचे शहरातील नागरिकांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न आहे, त्यासाठी आमच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन सुरू आहे.
- संचिता पाटील, सभापती,
पाणी पुरवठा

नागरिकांना दरवर्षी दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागायचे, त्यात पावसाळ्यात गढूळ पाणी ही समस्या होतीच. सापही नळाद्वारे आले आहेत. त्यामुळे शुद्ध पाणी मिळावे यासाठी केले जात असलेले नियोजन शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
- दिलीप आंबवणे, नागरिक, डेक्कन जिमखाना

आम्ही शहरातील सर्व सहा पाण्याच्या साठवण टाक्या स्वच्छ करण्याची निविदा काढली. ठेकेदाराकडून कामे करून घेताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्या कामावर लक्ष ठेवून होते. मात्र, प्रत्येक टाकीची स्वच्छता होत असताना सर्व पदाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी पाहणी करून टाक्या स्वच्छ होतात काय ते पाहिले.
- अशोक भालेराव, अभियंता, पाणी पुरवठा विभाग, कर्जत नगरपालिका

Web Title: After 5 years cleaning of water tanks in debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Karjatकर्जत