आगरदांडा : भारतातील मिनी गोवा म्हणून समजल्या जाणाऱ्या मुरुड तालुक्याला देश स्वतंत्र झाल्यापासून भेडसावत असणाऱ्या वीज समस्येतून, नव्या मुरुड विद्युत उपकेंद्राच्या मंगळवारी झालेल्या लोकार्पणानंतर कायमस्वरूपी मुक्ती मिळाली आहे. यामुळे मुरुड तालुक्यातील तब्बल २५ हजार वीज ग्राहकांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.मुरुड तालुका हा मुंबई, पुण्यापासून हा हाकेच्या अंतरावर असल्याने वीकेंडसाठी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येत असतात. वर्षाला सुमारे दहा लाख पर्यटक येथे येतात. गोव्यासारखाच समुद्रकिनारा मुरुडला लाभला आहे, परिणामी मुरुड तालुक्याला मिनी गोवा म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर देश-विदेशातील नावलौकिक प्राप्त होत असतानाच सततच्या खंडित वीज पुरवठ्याची गंभीर समस्या येथे भेडसावत होती. सण आणि शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांच्या काळात वीज पुरवठा खंडित होत असे आणि त्यातून लोकप्रक्षोभ उसळत असे. परिणामी सामाजिक शांततेवर त्याचा परिणाम होत असे. त्यातून वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याचे देखील प्रसंग येथे घडले होते. त्यास आता पूर्णपणे पूर्णविराम मिळाला आहे.मुरुडसाठी धाटाव (रोहा) येथून एक वीजवाहिनी होती. वाढत्या विकासाबरोबर आणि वीज ग्राहकांच्या वाढत्या संख्येमुळे विजेचा वापर वाढला आणि या एका वाहिनीतून होणारा वीज पुरवठा अपुरा पडू लागला आणि त्यातूनच वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत गेली होती. मुरुडकरिता स्वतंत्र वीज उपकेंद्र होणे जरुरी होते.राज्याचे तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि रायगडचे पालकमंत्रीसुनील तटकरे यांनी ही समस्या विचारात घेवून मुरुड वीज उप केंद्रास मंजुरी देवून निधीची तरतूद केली होती. यामुळे येथे वीज उपकें द्र उभे राहिले आहे.>नागरिक समाधानीविद्यमान ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या कारकिर्दीत या वीज उप केंद्रांची उभारणी करण्यात आली. मंगळवारी अलिबाग मुरुडचे आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते यावीज उप केंद्राचे लोकार्पण करण्यात आलेआहे.येथे उभारलेल्या वीज उपकेंद्रामुळे विजेची समस्या सुटल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त के ले असून आता बत्ती गुल होणार नसल्याने आनंदोत्सव साजरा के ला.
तब्बल ७२ वर्षांनी सुटली विजेची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 11:53 PM