तब्बल २९ तासांनंतर ओसरले कुंडलिका नदीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:02 AM2019-07-29T02:02:35+5:302019-07-29T02:02:44+5:30
वाहतूक सुरळीत : रोह्यात जनजीवन पूर्वपदावर
रोहा : रोह्याच्या कुंडलिकेला आलेल्या पुराचे पाणी तब्बल २९ तासांनंतर ओसरले. निसर्गाच्या प्रकोपाचा आणि लहरी वृत्तीचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव आला आहे. या कालावधीत बंद राहिलेली वाहतूक रविवारी पहाटे पूर्ववत सुरू झाली. रोहा अष्टमीकरांसह तालुक्यातील इतर भागातील नागरिक, प्रवासी, कामगार आणि विद्यार्थ्यांचे विस्कळीत झालेली जनजीवन सुरुळीत झाले आहे.
गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी मध्यरात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आणि पुराचे पाणि रोहा शहरातील दमखाडी, अष्टमी, वरसे आणि रोठ खुर्द गावांत शिरले. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मध्यरात्री तीन वाजल्यापासून पुलावरून अडीच ते तीन फूट पाणी वाहत होते. पुलावरूनही पाणी जाऊ लागल्याने रोहा पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवली होती. अष्टमीकडील गावांतून धाटाव एमआयडीसीमध्ये दुसºया पाळीसाठी आलेल्या कामगारांना काही कंपन्यांनी पाण्याची पातळी वाढल्याचे समजताच रात्री लवकर सोडले. गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे भिरा व डोलवाहळ धरणातून पाणी सोडण्यात येण्याची भिती व्यक्त होत होती. नदीच्या पाण्याची वाढलेली पातळी रात्री उशिरापर्यंत ओसरली नसल्याचे पाहून सखल भागात राहणाºया नागरिकांत थोडे भितीचे वातावरण होते. त्यामुळे नागरिक सतत नदीच्या पातळीकडे लक्ष ठेवून होते. मध्यरात्रीनंतर पावसाने अधून मधून थोडी विश्रांती घेतली, रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान वाढलेली पाणी पातळी ओसरली. त्यामुळे २९ तास इतका कालावधी पुराचे पाणी रोहा अष्टमीत राहण्याची ही पहिली घटना होती. निसर्गाच्या प्रकोपाचा आणि लहरी वृत्तीचा यंदा हा वेगळा अनुभव रोहेकरांना आला आहे. पाणी ओसारल्याने अष्टमीकडील अनेक गावांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
च्सतत कोसळणाºया पवसाचा फटका अष्टमी नाका आदी ठिकाणच्या लोकांना बसला असला तरी अष्टमी मराठा आळी येथील प्रेमा मारूती खैरे यांचे घर या पावसामुळे कोसळल्याने सरकारी यंत्रणेने पंचनामा करून मदत करवी अशी मागणी होत आहे.