आई होऊन पोलिसांनी दिले बालकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:36 AM2020-09-24T00:36:59+5:302020-09-24T00:37:09+5:30

जन्मदात्रीने टाकले कचऱ्यात : उपचारानंतर बाळाजी प्रकृती स्थिर; वात्सल्य ट्रस्टकडे सोपविले

After becoming a mother, the police gave life to the child | आई होऊन पोलिसांनी दिले बालकाला जीवदान

आई होऊन पोलिसांनी दिले बालकाला जीवदान

Next

निखिल म्हात्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : खाकी वर्दी गुन्हेगारीला आळा बसवते, तर सामान्यांना दिलासा देते, हे अनेक वेळा अनेक प्रसंगातून समोर आले आहे. पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन अनेकांचे प्राण वाचवले आहेत, अशीच एक घटना रसायनीत घडली. पोलिसांनी मायेचा हात ठेऊन आई बनून नवजात बालकाला नवे जीवन दिले आहे.
१ सप्टेंबरला रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर अर्भकाला कोणीतरी फेकून दिले होते. नुकत्याच जन्म झालेल्या बालकाला कचºयात टाकून जन्मदात्री निघून गेली होती. हे अर्भक पुरुष जातीचे असून, याबाबत रसायनी पोलिसांना एका महिलेने माहिती दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भकाला ताब्यात घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा सामान्य रु ग्णालयात दाखल केले. हे नवजात बालक कमी वजनाचे व कमी दिवसाचे होते. रु ग्णालयात आणले, तेव्हा त्याला धाप लागली होती आणि पोटात रक्तस्त्राव झाला होता. त्याचे वजन १ किलो ८२० ग्रॅम होते.
बालकाला रुग्णालयात आणल्यानंतर तातडीने त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. औषधोपचार करून बाळाला सुस्थितीत केले. आता त्या बाळाची प्रकृती उत्तम असून, त्याचे वजन आता १ किलो ९२० ग्रॅम झाले आहे.
डॉक्टर आणि परिचारिकांनी बाळाची उत्तम काळजी घेतल्याने आज हे बालक जग पाहतोय. त्यामुळे बाळाला आता अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार डी. जी. देडे, पी. आर. जंगम यांनी २२ दिवस या बालकाची
रु ग्णालयात राहून काळजी घेतली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ.एम. एस. क्षीरसागर, डॉ.आशिष पाटील, डॉ.मंजुश्री शिंदे, डॉ.सागर खेदु, डॉ.प्रीतम वरसोलकर, डॉ.पोटे, परिचारिका यांनी मुलाची काळजी घेऊन नवीन जीवन दिले आहे.

Web Title: After becoming a mother, the police gave life to the child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.