गणेशोत्सवानंतर साखरचौथच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:42 PM2019-09-15T23:42:49+5:302019-09-15T23:43:02+5:30

पेणसह पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या उत्तर रायगडातील आगरी-कोळी पट्ट्यात साखरचौथ गणरायाचा उत्सव चांगलेच बाळसं धरू लागला आहे.

After the Ganeshotsav, preparations are underway for the arrival of the father of Sakarachauth | गणेशोत्सवानंतर साखरचौथच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

गणेशोत्सवानंतर साखरचौथच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

Next

पेण : पेणसह पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या उत्तर रायगडातील आगरी-कोळी पट्ट्यात साखरचौथ गणरायाचा उत्सव चांगलेच बाळसं धरू लागला आहे. गेल्या दशकभरात या उत्सवाची क्रेझ वाढत असून पेणच्या मूर्तिकलेला अधिक वाव मिळून देणारा हा गणेशोत्सव नावीन्यपूर्ण कलाविष्काराचा अजब नमुना ठरत आहे.
दीड दिवसाचे हे गणराय व त्यांचा उत्सव सोहळा सर्वांसाठी प्रेक्षणीय असाच असतो. गणेशोत्सवाची समाप्ती झाल्यानंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला साखरचौथ गणरायांची प्रतिष्ठापना करण्याची गेले दशकभर परंपरा आहे. गावागावात तरुणाईने साखरचौथ गणराय उत्सवाचा चांगलाच लोकप्रिय केलेला आहे. साधारणपणे पेण ही गणेशमूर्तिकारांची नगरी असल्याने मूर्तिकारांना सुद्धा या उत्सवात सहभागी होता येते. मूर्तिकार बाप्पाच्या मूर्ती रंगविताना नावीन्यपूर्ण कलाविष्कार करुन कार्यशाळेच्या नावाची ओळख या मूर्तीच्या सादरीकरणातून केली जाते. युवा सार्वजनिक गणेश मंडळे व खाजगी गणपती मांडणारे गणेशभक्त या उत्सवासाठी आकर्षक मूर्तीची निवड करतात. यावेळी मूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात किंमतही मोजली जाते. त्यामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवानंतर साखरचौथ गणराय व नवरात्री उत्सवातील नवदुर्गेच्या मूर्ती अतिरिक्त व्यवसाय करून आर्थिक सधनता मिळते.
साखरचौथ गणराय उत्सवाला यावर्षी अंगारकी योग असल्याने या उत्सवाचे महत्त्वसुद्धा वाढलेले आहे. पेणच्या खारेपाट विभागातील गावांमध्ये हा उत्सव गावोगावी
खाजगी व सार्वजनिक स्वरुपात
मोठ्या प्रमाणात साजरा केला
जातो.
मूर्तिकलेचे माहेरघर असलेले हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवे, दादर, रावे व जिते या परिसरात साखरचौथ गणरायाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचबरोबर वाशी विभाग वडखळ विभाग ते गडब, आमटेम या विभागात सार्वजनिक मंडळाचे बाप्पा मोठ्या प्रमाणात उत्सवप्रसंगी दिसतात.
>संकष्ट चतुर्थीला होणार प्रतिष्ठापणा
साखरचौथ गणरायाचा उत्सवाचा माहोल पेण शहरासह ग्रामीण परिसरात उत्सव मंडळे सज्ज झाली असून मंगळवार १७ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टीला पुन्हा एकदा गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. मूर्तिकारांच्या कार्यशाळा ते सार्वजनिक साखरचौथ गणेश मंडळाच्या उत्सव मंडपात सजावट, आरास, लाइटिंग यासह गणेशभक्तांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्याची लगबग सुरू असल्याचे दिसत आहे.

Web Title: After the Ganeshotsav, preparations are underway for the arrival of the father of Sakarachauth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ganpatiगणपती