बिरवाडी : महाड एमआयडीसीमधील रस्त्यावर अवजड पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आदेश महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांनी महाड एमआयडीसीमधील एमएमए, सीईटीपी व व्यवस्थापकांच्या बैठकीप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना दिले होते. मात्र या आदेशाचे पालन संबंधित कारखानदारांकडून होत नसल्याचे दिसत आहे.महाड एमआयडीसीतील कारखानदारांनी बेकायदा वाहनांची पार्किंग सुरू ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होवून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कारखानदारांकडून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीच्या रस्त्यांचा अवैध वाहने पार्र्किं गकरिता वापर सुरू असल्याच्या अनेक तक्रारी संबंधित प्रशासनाकडे नागरिकांनी केल्या होत्या. त्याचप्रमाणे महाडच्या उपविभागीय पो. अधिकारी प्रांजली सोनावणे यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कारखानदारांनी रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने पार्र्किं ग करू नये, अशा सूचना २ सप्टेंबरला झालेल्या बैठकीमध्ये दिल्या होत्या. मात्र पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कारखानदारांकडून होत नसल्याने पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश वाऱ्यावर असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पोलिसांच्या आदेशानंतरही बेकायदा पार्र्किं ग सुरुच
By admin | Published: September 07, 2015 11:42 PM