सात वर्षांनंतर कालव्याला आले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:41 AM2018-05-26T03:41:08+5:302018-05-26T03:41:08+5:30

वाशी ते निवी विभाग झाला थंडगार : संघर्ष, आंदोलन आणि अथक प्रयत्नांना आले यश

After seven years, water came to the canal | सात वर्षांनंतर कालव्याला आले पाणी

सात वर्षांनंतर कालव्याला आले पाणी

Next

रोहा : मागील सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नव्हते. निवी, तळाघर, लांढर, वाशी पूर्ण विभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. तसेच गुरेढोरे, पशूपक्षी, झाडंझुडपं, पोल्ट्री, विविध शेतीला पाणी मिळाले नाही. अवघ्या परिसराला अक्षरश: वाळवंटाचे स्वरूप आले. बोअरवेल, विहिरी आटल्या. कालव्याला सुरळीत पाणी सोडावे अशी मागणी सातत्याने झाली. पण कालव्याच्या पाण्याकडे कोणी लोकप्रतिनिधींनी लक्षच दिले नाही. विभागात पाण्यासाठी संघर्ष आंदोलन उभे राहिले. पाण्यासाठी संघर्षाची धार अधिक प्रभावी बनली. तरीही सलग दोन वर्षे यश आले नाही. सर्वस्तरातून सुरु असलेले प्रयत्न, ग्रामस्थांच्या अथक संघर्षातून अखेर यशस्वी होवून कालव्याला अखेर पाणी आले आहे.
कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी भुवनेश्वर कालव्याला पाणी सोडावे. संपूर्ण विभाग पुन्हा सुजलाम सुफलाम व्हावा अशी मागणी सातत्याने झाली. त्याआधी कालव्याचे काम पूर्ण होऊ द्यात, मग तुम्हाला अखंड पाणी मिळेल हे पाटबंधारे विभागाचे आश्वासन होते. याउलट कालवा दुरुस्तीच्या नावाखाली नको तिथे मोऱ्या, कालव्याला काँक्र ीटीकरण करण्यात आले. त्यानंतरही पाणी सोडले गेले नव्हते.या कालव्याच्या दुरूस्ती कामांत लाखोंचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. लांढर, उडदवणे हद्दीतील काँक्र ीट पावसात अक्षरश: वाहून गेले. यातूनच ग्रामस्थांतून संताप व्यक्त झाला. सहा-सात वर्षे कालव्याला पाणी नाही. त्यामुळे वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी सर्वच गावांत पाण्यासाठी कायम संघर्ष राहिला. कालव्याला पाणी सोडा ही मागणी जोर धरू लागली. शेतकरी संघटना, वाशी, तळाघर, वरसे ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधींनी पाण्यासाठी पाठपुरावा केला. अशात कालव्याला पाणी येणार नाही हे लक्षात येताच ग्रामस्थांनी सर्वांनाच धारेवर धरले आणि सर्वांच्याच प्रयत्नातून अखेर मंगळवारी निवी भुवनेश्वरपर्र्यंतच्या कालव्याला पाणी आले आहे. कालव्याला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारेचे कार्य. अभियंता धनंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता श्वेता पाटील व सर्व अभियंता, कर्मचारी यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले.

तब्बल महिनाभर कालव्यातील गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. त्यासाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज झाली. त्यात कालव्याचे पाणी पुढे सरकताच संभे, किल्ला व अनेक ठिकाणी गळती झाली. त्यावरही अधिकाºयांनी मात केली. वाशी, लांढर, तळाघर, निवी ग्रामस्थांनी संभे ग्रामस्थांशी पाण्याबाबत चर्चा केली. त्यांनीही पाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. अखेर मंगळवारी सकाळी कालव्याचे पाणी शेवटच्या टोकातील निवी भुवनेश्वरपर्यंत आले.
कालव्याला पाणी आल्याचे दिसताच सबंध विभागात आनंदोत्सव साजरा झाला. गुरेढोरे, पशूपक्षी तृप्त झाले. बालगोपाळांनी पाण्यात भिजण्याचा आनंद लुटला. पाणी आल्याने ग्रामस्थांनी आमदार, सरपंच, अधिकाºयांचे आभार मानले. शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक समाधानी झाले. आता पूर्वीसारखे कालव्याला पाणी सुरळीत सोडले जाईल असे आश्वासन मुख्य कार्य. अधिकारी धनंजय गोडसे यांनी दिले. अभियंता श्वेता पाटील व टीमच्या प्रयत्नाचे विभागात कौतुक झाले आहे.

Web Title: After seven years, water came to the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी