Raigad: दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 06:17 PM2022-12-25T18:17:54+5:302022-12-25T18:18:08+5:30

Raigad: उत्खननात सापडलेली दुर्मिळ  ऐतिहासिक शिवकालीन दोन टन वजनाची तोफ अखेर दोनशे शिवप्रेमींच्या अथक प्रयत्नानंतर  द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली आहे.

After the efforts of two hundred Shiva lovers, the two ton cannon of the Shiva period finally rested on the Dronagiri fort | Raigad: दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली

Raigad: दोनशे शिवप्रेमींच्या प्रयत्नानंतर शिवकालीन दोन टनाची तोफ अखेर द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली

googlenewsNext

- मधुकर ठाकूर
उरण - उत्खननात सापडलेली दुर्मिळ  ऐतिहासिक शिवकालीन दोन टन वजनाची तोफ अखेर दोनशे शिवप्रेमींच्या अथक प्रयत्नानंतर  द्रोणागिरी किल्ल्यावर विसावली आहे.रविवारी (२५) किल्ल्यावर तोफ पोहचताच नाताळाच्या आनंदाबरोबरच शेकडो शिव,गड-दुर्ग प्रेमींनी भंडारा उधळत जल्लोष करत हर हर महादेव, जय शिवाजी जय शिवरायांच्या जयघोष केला.

मागील वर्षी उत्खननात सापडलेली दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची एक शिवकालीन ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटना प्रयत्नशील होत्या. ११ डिसेंबरच्या  रविवारपासूनच हर हर महादेव, जय शिवाजी जय शिवरायचा घोष करीत अनेक शिवप्रेमी संघटनांचे सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी,रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली होती.दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची तोफ ९०० ते १००० मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी,रस्सीचा वापर केला होता.मात्र दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची अवजड तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी सुमारे १२५ शिवप्रेमींची ताकत अपुरी पडली होती.त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे तोफ किल्ल्यावर पोहचविण्याची मोहीम फत्ते झाली नसल्याने त्यावेळी अर्ध्यावरच सोडावी लागली होती.

मात्र शिवकालीन ऐतिहासिक तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्याची जिद्द बाळगून असलेल्या सुमारे दोनशे शिव,गड-दुर्ग प्रेमींनी रविवारी (२५ ) नाताळाचा मुहूर्त साधून पुन्हा दुसऱ्यांदा प्रयत्न सुरु केला होता.यासाठी पहाटे सहा वाजता तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी सुरुवात केली. हर हर महादेव, जय शिवाजी जय शिवरायचा घोष करीत याआधी मध्यावरच फसलेली मोहिम दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फत्ते केली.रविवारी दुपारी ऐतिहासिक तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचताच शेकडो शिव,गड-दुर्ग प्रेमींनी भंडारा उधळत जल्लोष करत हर हर महादेव, जय शिवाजी जय शिवरायांच्या जोरदार जयघोष केला.

Web Title: After the efforts of two hundred Shiva lovers, the two ton cannon of the Shiva period finally rested on the Dronagiri fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड