शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अडीच वर्षांनी भेटल्यानंतर वडिलांनी मारली मिठी, मुलगा जिवंत असल्याची सोडली होती आशा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 11:53 AM

Family : उत्तर प्रदेश येथील पिता-पुत्राची अडीच वर्षांनी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

माणगाव : माणगावमध्ये फिरत असलेल्या अनेक मनोरुग्णांना माणगावचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन त्यांना उपचाराकरिता मनोरुग्णालयात पाठविण्यात येते.  अशाच प्रकारे उत्तर प्रदेश येथील पिता-पुत्राची अडीच वर्षांनी भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आले आहे. 

उत्तर प्रदेश येथील गाझीपूर भागातील ३० वर्षीय तरुण मनजे ऊर्फ मुलायम राजपूत शिवमुनी रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरात मनोरुग्ण अवस्थेत फिरत होता. माणगाव पोलिसांनी त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते.  उपचार सुरू झाले त्यावेळी त्याने फक्त दोन शब्द उच्चारले ते म्हणजे ‘दिलदार नगर, धनाडी’. यावरून समाजसेवा शाखेच्या अधीक्षक स्वाती कुलकर्णी यांनी त्याच्या घराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्याशी वारंवार संवाद साधून त्याकडून आणखी माहिती घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार गाझीपूरमधील पोलिसांसोबत संपर्क केल्यावर त्यांनी घर शोधले आणि  त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला. 

कुलकर्णी यांनी कॉलद्वारे त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधताच, आईवडील निःशब्द झाले आणि त्यांना रडू कोसळले. ‘बहुत इसको ढुंढा, मिलही नहीं रहा था, हमने इसकी जिने की उम्मीद छोड़ दी थी, हमारा लडका हमे मिलेगा यह सपने मे भी नही सोचा था,’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. 

गरिबीमुळे तक्रारही नव्हती केली!मुलाला घरी जाण्यासाठी कपडे नसल्याने पित्याने अंगावरचे कपडे त्याला देऊ केले. दारिद्र्य रेषेखालील हे कुटुंब असल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही केली नव्हती. ते फक्त आपल्या मुलाला शोधतच होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :Familyपरिवार