आगरदांडा जेट्टीवर स्वच्छतागृहच नाही !

By admin | Published: September 13, 2016 02:37 AM2016-09-13T02:37:09+5:302016-09-13T02:37:09+5:30

तालुक्यातील आगरदांडा जेट्टीवर मेरीटाईम बोर्डाने तोडलेल्या स्वछता गृहाच्या जागी तातडीने स्वच्छता गृह बांधावे आणि प्रवाशांची होणारी कुंचबणा थांबवावी अशी

Agadanda Jetty does not have a cleaner room! | आगरदांडा जेट्टीवर स्वच्छतागृहच नाही !

आगरदांडा जेट्टीवर स्वच्छतागृहच नाही !

Next

नांदगाव / मुरूड : तालुक्यातील आगरदांडा जेट्टीवर मेरीटाईम बोर्डाने तोडलेल्या स्वछता गृहाच्या जागी तातडीने स्वच्छता गृह बांधावे आणि प्रवाशांची होणारी कुंचबणा थांबवावी अशी आग्रही मागणी आगरदांडा ग्रामपंचायत उपसरपंच बाबासाहेब अर्जबेगी यांनी केली आहे.
मुरूडसह श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांना जोडणारी सतत प्रवाशांची वर्दळ असणारी आगरदांडा ही महत्त्वाची जेट्टी म्हणून गणली जाते. ऐतिहासीक जंजिरा किल्ला, दिवेआगारचे सुवर्ण गणेशमंदिर, श्रीमंत पेशव्यांचे श्रीवर्धन, दक्षिण काशी म्हणून मान्यता असलेल्या हरिहरेश्वर तसेच समुद्र किनारे पाहण्यासाठी जंगल जेट्टी तसेच प्रवासीजल वाहतूक सेवा वर्षभर आगरदांडा ते दिघी अशी सुरु असते. त्यामुळे शेकडो पर्यटकांची वर्दळ बंदरावर असते. परंतु येथिल स्वछतागृह मेरीटाईम बोर्डाच्या आदेशाने पाडण्यात आले असून त्या जागी पोलीस गस्तीसाठी गेस्टरुम उभारले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रवाशांची विशेषत: महिलांची स्वच्छता गृह नसल्याने कुंचबणा होत आहे. प्रसंगी महिला प्रवाशांना आयसीआयसी कोस्टगार्डच्या शौचालयाचा वापर करणे भाग पडते. मेरी टाईम बोर्डाचे सर्व सोयींनी युक्त कॉर्पोरेट टच आॅफीस उद्घाटनाअभावी रखडले आहे. बंदर आधिकारी धोत्रे यांच्याशी संपर्कसाधला असता उदघाटनाविषयी वरिष्ठच आधिकृत काय ते सांगू शकतील असे ते म्हणाले.
सुवर्ण दुर्ग शिपींग कं . तसेच दिघी जलप्रवासी वाहतूक कंपन्या प्रवाशांची तसेच अवजड वाहनांची ने-आण आगरदांडा ते दिघी बंदर सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत करीत असतात. तथापि पर्यटक तसेच स्थानिकांची वर्दळ मोठया प्रमाणावर असूनही स्वछते कडे दुर्लक्ष केल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी मेरीटाईम बोर्डाने स्वच्छता गृहाची व इतर सुविधांची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Agadanda Jetty does not have a cleaner room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.