- निखिल म्हात्रेअलिबाग : आगामी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेत महसूल विभागाने कंबर कसली होती. जिल्ह्यात सुमारे १५ हजार नवीन मतदारांनी नोंदणी केली आहे. आता जिल्ह्यात ११ लाख ७९ हजार ९६५ पुरुषांनी तर ११ लाख ४० हजार १८५ स्त्रियांची मतदार नोंदणी पूर्ण झाली असून यामध्ये नव्वदी पार केलेले १ हजार ७४ मतदार ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात नवीन मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.जिल्ह्यात मतदार पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात आला असून त्याअंतर्गत नवीन नाव नोंदणी, तसेच नावे वगळणे, दुबार नावे छाननी व वगळणे अशी कामे सुरू आहेत. नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आदिवासी पाड्यांवर जाऊन नाव नोंदणी करणे, प्रत्येक महाविद्यालयातील नव मतदारांची नाव नोंदणी करणे आदी कामांसाठी प्रत्येक महाविद्यालयात एक अध्यापक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या आस्थापनांकडून माहिती मागवून त्यांच्या कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी, काम सोडून गेलेल्यांची पत्ता बदललेल्यांची नावे वगळणे, जिल्ह्यातील सुमारे ३ हजार गृहनिर्माण संस्थांच्या संचालकांमार्फत त्या त्या संस्थेतील मतदारांची नोंदणी, स्थलांतरितांची नावे वगळणे, नावात बदल आदी कामे होत आहेत. नवीन मतदार नोंदणीसाठी या अभियानात आतापर्यंत ३६ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यावर सध्या काम ही सुरू आहे.तालुकानिहाय नव्वदीपार मतदारकर्जत ३८२उरण ८१पेण २६५अलिबाग ३३३श्रीवर्धन १२एकूण १,०७४१५ हजार नवमतदारसन २०२० मध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक, युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १५ हजार ९२० नवमतदारांनी नोंदणी केली आहे. या नवमतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.
दीड हजार मतदारांचे वय नव्वद वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 1:56 AM